*राष्ट्रवादी वक्ता सेल कडून वाढत्या महागाई संदर्भात पंतप्रधान यांना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन*

वर्धा, दिनांक ०१ जुलै २०२१
पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती दिवसेंदिवस गगणाला भिडत असल्यामुळे माणसाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तुत सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे. एकीकडे वाढती बेरोजगारी व कोरोना सारख्या भयानक संकटामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. महिलांना सुद्धा कुटुंब कसे चालवावे हा मोठा प्रश्न पडला आहे. सततची नापिकी व नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्ग सुद्धा पूर्णतः खचून गेला आहे. कोरोनाच्या संकटाने अनेकांची नौकरी व हाताचे काम गेल्यामुळे अशा परिस्थितीत जगावे कसे हाच मोठा प्रश्न प्रत्येक घटकांसमोर उभा आहे. त्यामुळे वाढत्या महागाईला आळा घालावा व योग्य नियोजन करुण सर्वसामान्यांना दिलासा द्यावा यासाठी राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील फाळके यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी वक्ता सेल च्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. कपिल मून यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देत प्रधानमंत्री महोदय यांना विनंती करण्यात आली. याप्रसंगी वक्ता सेल जिल्हा कार्याध्यक्ष सतीष गवळी, योगेशभाऊ घोगरे, चंद्रपाल भगत, रूपेश शेळके, एडवोकेट महेंद्र पारिसे, अंकीताताई थूल, प्रवीण पेठे, दिव्हांश गवळी उपस्थित होते.