मोहता इंडस्ट्रीजच्या कामगारांची पोलीस ठाण्यावर धडक
मोहता इंडस्ट्रीजच्या कामगारांची पोलीस ठाण्यावर धडक

मोहता इंडस्ट्रीजच्या कामगारांची पोलीस ठाण्यावर धडक

मोहता इंडस्ट्रीजच्या कामगारांची पोलीस ठाण्यावर धडक
मोहता इंडस्ट्रीजच्या कामगारांची पोलीस ठाण्यावर धडक

आशीष अंबादे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट 02/07/2021
मोहता इडस्ट्रीजच्या प्रोसेस,फोल्डिंग,रिंगफ्रेम व अन्य विभागातील कामगारांचा मार्च ते मे या कालावधीतील वेतन न दिल्याने संतप्त कामगारांनी इंटकचे महासचिव आफताब खान यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनवर आज सकाळी मोर्चा नेऊन आपले निवेदन सादर केले. पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोना काळात कामगार पगाराआभावी त्रस्त असतांना उलट ६जून पासून कोरोना काळातील लॉक – डाऊन च्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून 6 जून पासून गिरणी ताळेबंद करण्याची नोटीस लावली.व कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.
या निर्दयी कृत्या मुळे संतप्त कामगारांनी पगारा साठी आज सरळ पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन आपला आक्रोश व्यक्त केला.तीन दिवसात या प्रश्न वर तोडगा काढावा व गिरणी पूर्ववत सुरू करून मागील काळातील पगार द्यावा असे निवेदन ठाणेदार संपत चव्हाण यांना सादर केले.यावेळी ठाणेदार चव्हाण यांनी मोहता गिरणी व्यवस्थापकाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मोहता गिरणी सुरू होऊन कामगारांचे थकीत वेतन न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेत्यांनी दिले. या मोर्चाचे नेतृत्व इंटकचे महासचिव आफताब खान,रवी गोडसेलवार,विलास धाबर्डे, एकनाथ डेकाटे,प्रवीण चौधरी,नाना हेडाऊ,रणजित ठाकूर,देवराव साबळे,विलास बोडे संजय मगर,संजय वाटकर,डोंगरे,सुनील राऊत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here