धुळे जिल्हा हादळला: पत्नीच्या अनैतिक संबंधातून शिक्षक पतीची हत्या.

धुळे जिल्हा हादळला: पत्नीच्या अनैतिक संबंधातून शिक्षक पतीची हत्या.

धुळे जिल्हा हादळला: पत्नीच्या अनैतिक संबंधातून शिक्षक पतीची हत्या.
धुळे जिल्हा हादळला: पत्नीच्या अनैतिक संबंधातून शिक्षक पतीची हत्या.

✒धुळे जिल्हा प्रतिनिधी✒

धुळे,दि.2 जुलै:- धुळे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. धुळे  तालुक्यातील सरवड फाट्यावर कारच्या धडकेत ठार झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक संदीपकुमार विश्वासराव बोरसे वय 34 वर्ष राह. सरवड, ता. धुळे याच्या मृत्यूप्रकरणाची सोनगीर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली. जिल्हा परिषद शिक्षक संदीपकुमार विश्वासराव बोरसे यांच्या अपघात झाला नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली.

पेशाने जिल्हा परिषद शिक्षक असलेला संदीपकुमार विश्वासराव बोरसे याचा 26 जून ला सरवड ते लामकानी रोडवर सप्तशृंगी मंदिरासमोर रात्री 9 वाजेच्या दरम्यान अपघात झाल्याने मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासणी वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची  माहिती सोनगीर पोलिसांत नोंदविण्यात आली होती. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असताना मिळालेले धागेदोरे आणि मृताच्या नातेवाइकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून अपघात नसून हा घातपात असल्याचा संशय निर्माण झाला. सोनगीर पोलिसांनी शरद दयाराम राठोड वय 36 वर्ष राह. पाडळदे, ता. धुळे, हल्ली मुक्काम जय मल्हार कॉलनी, साक्री रोड, धुळे आणि राकेश ऊर्फ दादा मधुकर कुवर (कोळी) वय 31 वर्ष, राह. सरवड, ता. धुळे या दोघांना अटक करण्यात आली.

शरद राठोड याचे शिक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती झाल्यापासून संदीपकुमार दारूच्य नशेत कायम शरदला शिवीगाळ करीत होता. त्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी चक्रव्यु तयार करण्यात आले. 26 जूनला रात्री शरद राठोड याने दादा कोळी याच्याशी संगनमत करून देवभाने फाट्यावर पार्टीच्या बहाण्याने संदीपकुमार याला कारने नेले. तेथे दारू पाजून संदीपकुमार यांना नशेत तल्लीन केले. तसेच रात्रीच त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने सरवड गावाजवळ रोडवरच सोडून दिले. त्यानंतर बोरसे हे घरी पायी जात असताना संदीपकुमार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरात धडक देऊन उडविले. अपघाताचा बनाव करीत संदीपकुमार यांचा एक प्रकारे खून करण्यात आला. पोलिसांना घटनास्थळी मिळालेला कारचा लोगो, बंफरचे तुकडे, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज अशा काही पुराव्याच्या साहाय्याने गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. शरद राठोड आणि राकेश कुवर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व त्यांच्या पथकाने केली.