अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश

✍️मनोज खोब्रागडे✍️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961

अकोला,दि.2 (जिमाका)- अनुसूचित जातीमधील बहुतांश व्यक्ति शेतमजुर व लहान सिमांकित शेतकरी असल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांच्या मुलांचे शैक्षणिक विकास करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी 80 टक्के, अनु. जमातीसाठी 10 टक्के, विमूक्त जातीचे पाच टक्के, दिव्यांगासाठी तीन टक्के व एसबीसीसाठी दोन टक्के मुलींसाठी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेली अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा गोरेगाव खुर्द, जि.अकोला येथील निवासी शाळेमध्ये शैक्षणिक सत्र 2021-22 करिता इयत्ता सहावी व सातवी अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता आणि आठवी ते दहावी मधील रिक्त जागांकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचे अनुसूचित जाती मुलींचे शासकीय निवास शाळेचे मुख्याध्यापक यांनी कळविले आहे.