मुंबई क्षुल्लक कारणावरून मुला-मुलीना कमरपट्ट्याने बेदम मारहाण; हात जोडून विनवणी करूनही तरूणीला बुक्क्यांनी मारल.

✒️अभिजित सपकाळ✒️
मुंबई भिवंडी प्रतिनिधी
9960096076
ठाणे/कल्याण,दि.3 जुलै:- मुंबईच्या ठाणे जिल्हातील कल्याण परीसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुचाकीनं एका ऑटो रिक्षाला किरकोळ धडक लागली होती. या कारणातून काही स्थानिक लोकांनी दुचाकीवरील एका तरुणाला आणि तरुणीला बेदम मारहाण केली आहे. आरोपीं जमावाने संबंधित मुलीचे केस पकडून तिलाही बुक्क्यांनी मारहाण केली आहे. ही घटना काल रात्री उशीरा कल्याण येथील काळसेवाडी भागात घडली.

घटनास्थळी उपस्थीत असलेल्या एका व्यक्तीने या घटनेची चित्रफित आपल्या मोबाइल फोनमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

कल्याण येथील काळसेवाडी भागात काल रात्री सव्वा बाराच्या सुमारास एक तरुण आणि तरुणी दुचाकीनं जात होतं. दरम्यान वाटेत त्यांच्या दुचाकीनं एका रिक्षाला किरकोळ धडक लागली. यावरून संबंधित तरुण आणि रिक्षा चालकात बाचाबाची झाली. यानंतर रिक्षा चालकानं आसपासच्या लोकांना गोळा करून तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावानं तरुणाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत बुक्क्यांनी आणि कमरपट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.तरुणीनं हात जोडून मित्राला न मारण्याची विनंती केली. तरीही आरोपी तरुण मारतच राहिले. दरम्यान, या घटनेची चित्रफीत सामाजिक माध्यमावर सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संतप्त व्यक्त करण्यात येत आहे.