ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा,महिला आघाडीची मागणी.

सुरेश नंदिरे, प्रतिनिधी
9923497800
औरंगाबाद, दि.3 जुलै:- ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे. 2021 जून पासूनचे चालू वर्षाचे ऑनलाइन शिक्षणाचे फिस शुल्क हे 50 टक्के करण्यात यावे. या प्रमाणे जीआर शिक्षण मंत्री यांच्याकडून प्रत्येक शाळेला पाठवण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने उपसंचालक शिक्षणाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांना देण्यात आले.
मागण्या मान्य न केल्यास वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन महिला आघाडीकडून पाटी लेखन आंदोलन करण्यात येईल.असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष वंदना नरवाडे, महासचिव उज्वला मानकर, आशा पवार, शहर उपाध्यक्ष पौर्णिमा हिवराळे, शहर सहकोषाध्यक्ष हर्षा अंभोरे, शहर सचिव सुजाता गायकवाड, सचिव जया गजभिये, प्रसिद्धीप्रमुख श्रुती शिरसाट, शहर सदस्य नर्मदा देंडगे व वंचित बहुजन आघाडीचे प्रचारक शाहीर मेघानंद जाधव उपस्थित होते.