लातूर जिल्हात खळबळ: साडीने गळफास घेऊन दोन बहिणींनी केली आत्महत्या.

✒लातूर जिल्हा प्रतिनिधी✒
लातूर,दि.3 जुलै:- लातूर जिल्हातील हरंगुळ बु. शिवारातील गोविंदनगर परीसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील दोन बहिणींनी एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.
बार्शीरोड हरंगुळ बु. शिवारातील गोविंदनगर भागात राहणाऱ्या गितांजली दत्तात्रय बनसोडे वय 17 वर्ष आणि तिची मावस बहिण धनश्री संतराम क्षीरसागर वय – 20, मुळ रा.कानेगाव ता. लोहारा जि. धाराशीव यांनी एकाच साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. दोन्ह बहिणीनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी आले आणि पंचनामा करुन दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिले. पुढील तपास पोलीस करित आहे.