नागपूर पोलीस दलात खळबळ: विशेष सुरक्षा पथकातील पोलीस जवानाने स्वतःला घातली गोळी.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर:- नागपुर पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विशेष सुरक्षा पथकात (एसपीयू) कार्यरत पोलिस कर्मचारी प्रमोद शंकरराव मेरगुवार वय 46 वर्ष यांनी स्वतःला गोळी मारून केली आत्महत्या केली. शनिवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस जवानाने आत्महत्या केल्याची उघड झाल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून प्रमोद विशेष सुरक्षा पथकात कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोना झाला. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांचे म्युकरमायकोसिसचे ऑपरेशन झाले. त्यानंतर डोळे आणि डोक्याचा त्यांना त्रास होऊ लागला.
कुटुंबीयांनी त्यांच्यावर हैदराबाद येथेही उपचार केले. मात्र, पाहिजे तसा लाभ झाला नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली. मनोबल नसल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून कमालीचे अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी त्यांनी आपल्या मानकापूरातील घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.