भाजपाच्या सत्ता काळात राज्यात खनिजकर्म महामंडळामध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा; सीबीआय, ईडी द्वारा चौकशीची मागणी.

54

✒️मनोज कांबळे✒️
मुंबई ब्युरो चीफ
मुंबई,दि.3 जुलै:- सध्या महाराष्ट्र अनेक कारणांनी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी आरोप प्रत्यारोप करत आहे. महाराष्ट्रात सध्या सीबीआय आणि ईडीच्या चौकशीवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधातील भाजपामध्ये राजकारण रंगल्याचे चित्र सर्वीकडे दिसून येत आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेते हे सीबीआय आणि ईडी ह्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. दरम्यान, आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर घोटाळ्याच मोठा आरोप केला आहे. भाजपाच्या सत्ताकाळात खनिजकर्म महामंडळामध्ये तब्बल 43 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे.

भाजपाच्या सत्ताकाळात खनिजकर्म महामंडळातील कोल वॉशरिजमध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत प्रशांत पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय आणि ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खनिजकर्म महामंडळाच्या टेंडर प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. हा घोटाळा मी डिसेंबर 2020 मध्ये मी जय जवानच्या मंचावर समोर आणलं होतं. नानाभाऊंनी घोटाळा समोर आणला नाही. मात्र यातील कंपन्यांमा वेगळ्या पद्धतीने क्वालिफाय केलं का याबाबत त्यांनी शंका घेतली. हिंद एनर्जी आणि अरिंहंत या दोन कंपन्यांना काम दिले गेले, त्यांनी 15 लाख टन कोळसा नेला. या क्वालिजमध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. भाजपाच्या काळात हे कोल ब्ल़ॉक मिळाले होते, असा आरोप पवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, दोन कंपन्यांना 15 लाख टन कोळसा कोल गेला आहे. त्यातील हिंद एनर्जीचा इतिहास काढला तर ईडीही आश्चर्यचकीत होईल. हे मोठे प्रकरण आहे. याच्यावर ईडी चौकशी लावली पाहिजे. हे प्रकरण समोर आणलं तर किती लोक तुरुंगात जातील हे कुणालाच कळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.