लातूर: तिन बहीण-भावांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाच चितेवर तिघाला अग्नीदाह.

✒️लातूर जिल्हा प्रतिनिधी✒️
लातूर,दि.4 जुलै:- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सुनेगाव शेंद्री या गावात एकाच परीवारातील तीन चिमुकल्यांचा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनामुळे सर्वीकडे हयहय व्यक्त करण्यात येत आहे. मृत पावलेले तिघेही भावंड सुनेगाव येथील जायभाये कुटुंबातील आहेत. 14 वर्षीय रोहिणी जायभाये, 9 वर्षीय प्रतीक जायभाये हे सख्खे बहीण-भाऊ आणि 12 वर्षीय सख्खा चुलत भाऊ गणेश जायभाये हे तिघेसोबत मन्याड नदीच्या काठावर बक-या चारण्यासाठी गेले होते.

नदीच पाणी पाहुण या तिघांना पोहोण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे तिघेही नदीपात्रातील एका डोहात पोहण्यासाठी उतरले. मात्र दुर्दैवाने या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. परिणामी तीनही चिमुकल्यांचा नदीपात्रातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नदीपात्रातील अवैध रेतीची मोठ्या प्रमाणात झालेल्या उपशामुळे नदीत मोठ्या प्रमाणात खद्दे झाले या तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे.

या घटनेमुळे जायभाये कुटुंबियांसह संपूर्ण गावावर मशाववट शोककळा पसरली. रात्री उशिरा या तिघांवरही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here