*सोयगाव तालुक्यातील समस्या प्राधान्याने सोडवा : राज्यमंत्री अब्दुल सत्तार*
*सोयगाव तालुक्यात कोविड चाचण्या अधिक करा*
*तपासणी नाक्यांना दिली भेट*
*ग्रामीण कोविड रुग्णालयाची केली पाहणी*
*सिल्लोड येथे रुग्णवाहिकांचे लोकार्पण*

*सोयगाव तालुक्यात कोविड चाचण्या अधिक करा*
*तपासणी नाक्यांना दिली भेट*
*ग्रामीण कोविड रुग्णालयाची केली पाहणी*
*सिल्लोड येथे रुग्णवाहिकांचे लोकार्पण*
✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961
औरंगाबाद, (जिमाका) : सोयगाव तालुक्यातील असलेल्या विविध समस्या जिल्हा प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाने प्राधान्याने सोडवाव्यात अशा सूचना ग्रामविकास, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्या. सोयगाव शहराला स्वच्छ पाणीपुरवठा, स्वच्छ परिसर, रस्ते, आरोग्य सुविधा आदींबाबत सविस्तर आढावा श्री. सत्तार यांनी घेतला.
सोयगाव तहसील कार्यालयात राज्यमंत्री सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ.माधुरी तिखे, तहसीलदार प्रवीण पांडे,उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, प्रभारी मुख्याधिकारी विठ्ठल जाधव,नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे आदींची उपस्थिती होती. यावेळी सोयगाव कोविड केंद्राबाबत उभारणी तातडीने करण्याबाबतच्या सूचना बांधकाम विभागाला श्री. सत्तार यांनी दिल्या. शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी सिल्लोड नगर पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी पुढाकार घ्यावा. खरीप हंगामाच्या पिक कर्जातून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी थेट तहसीलदारांनी जिल्हा बँकेच्या नूतन सभासद शेतकऱ्यांची यादीच तयार करून कर्ज मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावी, अशा सूचना तहसीलदार प्रवीण पांडे यांना केल्या. आहे.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विविध अडचणीवर बैठकीत चर्चा करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने शेत रस्ते,शिव रस्ते आणि पानंद रस्ते याबाबत तहसीलदार,उपजिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करावी, असे निर्देश देण्यात आले. शहरातील सफाई,दुर्गंधी याबाबतही मुख्याधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही सत्तार यांनी प्रशासनाला दिल्या.
*शहर लखलखीत करणार*
शहरातील पथदिव्याच्या बाबतीत तातडीने सर्वेक्षण करून शहराला नव्याने पथदिवे बसविण्यात येतील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.शंकर कसबे,वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे,अजय डोंगरे,रुपाली जावळे आदींची उपस्थिती होती. ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णालयाची ही पाहणी श्री.सत्तार यांनी केली व सूचना ही केल्या. तसेच शेंदूरणी आणि फरदापूर येथील तपासणी नाक्यांना भेट देऊन कामकाजाबाबत सूचना देखील केल्या.
*सिल्लोड मधील रुग्णवाहिकांचे लोकार्पण*
सिल्लोड तहसील कार्यालयात तालुक्यातील पालोद आणि पानवडोद प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांचे राज्यमंत्री सत्तार आणि जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याहस्ते लोकार्पण झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.