छत्र हरपलेल्या कुटुंबियांना दिला आधार ;
* उध्वस्थ संसारात घातली मायेची फुंकर
* मदतीच्या आव्हानानंतर सरसावले शेकडो हात

* उध्वस्थ संसारात घातली मायेची फुंकर
* मदतीच्या आव्हानानंतर सरसावले शेकडो हात
राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-
या पंधरवाड्यात पावसाने चांगलेच झोडपले.यात गोंडपिपरी तालुक्यातील बऱ्याच गावात नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.अश्यात नांदगाव येथिल प्रदिप भोयर यांच्या घरावर विज कोसळली,अन राहते घर उध्वस्थ झाले.तर सकमूर गावातील रवी घूबडे यांचे घर पावसाने जमिनदोस्त केले.या दोनही घटनेने अवघे समाजमन हळहळले.यानंतर युवकांनी पुकारलेल्या मदतीच्या आव्हानाला सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळाला.रविवारी(दि.४)एकत्र झालेली मदतीची रक्कम आणि संसरोपयोगी साहित्यांसह किराणाचे सामान या कूटूंबीयांना वितरीत करण्यात आले.
समाजमाध्यमाने सार काही वेगवान झाले.याचे जितके फायदे तितकेच तोटे.व्यक्ती याचा वापर कसा करतो यावर सर्व काही अवलंबून आहे.असाच समाज माध्यमाचा वापर करत गोंडपिपरी यंग ब्रिगेडचे सुरज माडुरवार आणि समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या अनिकेत दुर्गे या ध्येयवेड्या तरुणांनी काही तासातच संकटास सापडलेल्या तालुक्यातील भोयर आणि घूबडे या दोनही संसारात जगण्याची नवी उमेद जागविली.यासाठी समाजातील विविध घटकातून मदत जमा झाली.गोंडपिपरीचे तहसिलदार मेश्राम,ठाणेदार धोबे,गोंडपिपरी तालुक्यासोबतच बाहेरुन विविध सामाजिक संघटना,युवक मंडळे मदतीसाठी पुढे आलीत.अनेकांनी स्वयंस्फुर्थीने मदत पाठवली.अन “एक हात मदतीचा” म्हणत पुकारलेल्या आव्हानानंतर शेकडो हात एकत्र आले.आणि एक लाखाच्या जवळपास रक्कम गोळा झाली.यानंतर रविवारी(दि.४) नांदगावात विज कोसळून घर उध्वस्थ झालेल्या भोयर कुटुंबाची मदतकार्य जमा करणाऱ्या शिष्ठमंडळाने भेट घेतली.यावेळी ६० हजार रोख रक्कम,संसारोपयोगी साहित्य आणि किराणाची मदत देण्यात आली.तर सकमूर येथिल घूबडे कुटूंबियांची देखिल याच दिवशी थेट भेट घेतली.यावेळी घूबडे कुटूंबियांना २० हजार रोख,संसारोपयोगी साहित्य आणि किराणाची मदत घरपोच देण्यात आली.यावेळी सुहास माडूरवार,नितेश मेश्राम,राकेश पुन,अंकूर मल्लेलवार,डाॕ. पत्रीवार,सुरज माडुरवार,अनिकेत दुर्गे,समीर निमगडे,गोकुल सोंनटके,अक्षय भोयर,बंटी धुडसे,निलेश झाडे,प्रमोद दुर्गे,सुनील फुकट,शुभम मेश्राम आदिची उपस्थिती होती.यावेळी दोनही कूटूंबियांनी समाधान व्यक्त करित मदतगारांचे आभार मानले.
—————————————-
अन आमदार मुनगंटिवार गहिवरले…
गोंडपिपरी तालुक्यात पावसाने दोन संसार उघड्यावर आल्याची बाब समजताच आमदार सुधिर मुनगंटिवार गहिवरले.त्यांनी देखिल १० हजारांची मदत पाठवत मी देखिल आपल्या पाठिशी उभा असल्याची जानिव करुन दिली.