*मदनी ट्रस्ट आणि जमियतने केले हिंदू बांधवांच्या प्रेताच दहन*

58

नीलम त्रिभुवन विशेष संंवादाता:-
जाती धर्माच्या भिंती मोडून माणुसकी आली धावून कोरोनाने जाती धर्माच्या भिंती मोडून टाकल्या आहेत, त्याचा प्रत्यय मंगळवारी आला सांगलीतल्या एका हिंदू धर्मातील गुजराती समाजाच्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार जमियत उलेमा हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी पार पाडला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रेताच दहन करण्यावर बहिष्कार टाकला होता त्यामुळे या दोन्ही सामाजिक संघटनांनी मृतदेहाला अग्नी दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. अनेकांचा दुर्दैवी मृत्यू होतोय. काल मंगळवारी सांगलीच्या रतनशी नगर मध्ये रहाणाऱ्या गुजराती समाजातील एका व्यापाऱ्याचा मेहता हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. महापालिकेचे कर्मचारी कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे अत्यसंस्कार करतात. पण महापालिकेच्या वतीने अत्यसंस्कार करणाऱ्याच्या पथकातील एका स्वच्छता निरीक्षकाचा मृत्यू झाला त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकला अशावेळी मृत्यू झालेल्या नातेवाईका पुढे अत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. त्यानी मदनी ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए-हिंद ही संघटना मदतीला आली जात पात धर्म याचा कोणताही विचार न करता महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या परवानगीने सदरच्या व्यक्तीच मृतदेह ताब्यात घेऊन मिरजेतील पंढरपूर रस्त्यांवरील स्मशान भूमीत अत्यंसंस्कार पार पाडत आपण समाजाचे देने लागतो मग तो समाज कोणत्याही जाती धर्माचा असो, हिंदू बांधव हे आपले मोठे भाऊ आहेत भावाने भावाला मदत केली पाहिजे आणि तीही अस अत्यसंस्कार करून आपलं कर्तव्य पार पाडल! एरव्ही जाती जातीत भांडण लावून बघत बसणाऱ्या कोणत्याही धर्माच्या लोकांच्या डोळ्यात झमझणीत अंजन घालणार आहे. हिंदू पद्धतीने अत्यसंस्कार करणाऱ्या दोन्ही संघटनेतील मदनी ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष आणि जमियत हिंदचे कार्यध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, मदनी ट्रस्टचे महासचिव सुफियांन पठाण, अफजल मोमीन, सलीम किल्लेदार, मोईन शेख, फराज हकीम, सद्दाम जमादार,तौसिफ मनेर, यांचा समावेश होता या संघटनेच्या वतीने आतापर्यंत 89 मृतदेहावर अंतिम विधी केलंय त्यात 76 मुस्लिम आणि 6 हिंदू समाजातील मृतदेहाचा समावेश आहे. खरोखरच या कोरोनामुळे लोकडाऊनच्या काळात मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंद या संघटनेच्या वतीने गरीब गरजू तसेच दिव्यांग कुटुंबातील लोकांना रेशन वाटप तसेच 22 मार्चपासून अचानक लॉक डाऊन घोषित करण्यात आल्यानंतर दररोज हजारो लोकांना जेवण पुरवण्याचे काम केलं सिव्हील हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनाही भोजन देण्याचे महत्वाचे काम केलं आहे