“प्रेमाचे गुंतले धागे”मराठी अल्बम शूटिंग चे थाटात शुभारंभ

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
व्यवसायाने शिक्षक असलेल्या ध्येयवेड्या शिक्षकाने तरुण पिढीला थिरकायला लावणाऱ्या गीतांचा अल्बम तयार करून कोरोना काळात कोमेजलेल्या तरुणांच्या मनात उत्साह निर्माण करण्यासाचा एक आगळा वेगळा प्रयत्न केला आहे. दिनांक 4 जुलै 2021 रोज रविवारला सुप्रसिद्ध कोरियोग्राफर मा. अब्दुल जावेद यांच्या शुभ हस्ते “जीव माझा तुझ्यात गुंतला” या रोमँटिक गीताच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ता विश्वजित शाहा,निर्माता सौमित्र सरकार, पिंटू शाहा, संगीत संयोजक आशिष गायगोले, संदीप मंडल,जीवाशिवा फेम प्रिया मोंढे, मेकअप आर्टिस्ट निशा धोंगडे, गीतकार मुरलीधर सरकार, गायक मुकेश कुमार, मकसूद खान,निखिल गटलेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सदर अल्बम च्या गीतातून तरुणांसाठी प्रेमगीत तर लहान वयात आई वडिलांची छत्रछाया हरवलेल्या पाल्याच्या व्यथा व्हिडिओ च्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचले जाणार आहे. सर्व स्तरातून मुरलीधर सरकार यांच्या प्रेरणादायी कार्याचे प्रशंसा केल्या जात आहे.स्थानिक कलाकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न सदैव करणार आहे.तरुणांपासून तर थोर मोठ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका सरकार तर आभार प्रदर्शन सुरज मंडल यांनी मानले.यावेळी टीम सदस्य राजू गोयल,मनीषा घडीवर,रोशनी,फिझा पठाण, वसुधा गावतुरे,सरला सरकार, गुंजन दास,समीर दास, शुभम अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.