महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान संचालित विश्र्वशांती ग्राम सेवा संघ विठ्ठलवाडा तर्फे..
नवनियुक्त महीला तालुका अध्यक्ष रेखा रामटेके यांचा साळी चोळी देऊन सत्कार..

नवनियुक्त महीला तालुका अध्यक्ष रेखा रामटेके यांचा साळी चोळी देऊन सत्कार..
राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा गाव सद्या प्रगती पथावर आहे.गाव विकसित होत आहे.एके काळी या गावातून मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदे मध्ये अध्यक्ष होऊन गेलेत.केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ विठ्ठल वाडा गावाला मिळत आहे. ग्रापंचायतींच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. कारण ही तसेच आहे या गावातील जनतेनी मागील निवडणुकीत दाखवलेली सज्ञानता आणि प्रभागाचा विकास करू शकेल असे गुणधर्म असलेल्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले.हे मात्र विशेष.
या मध्ये तो एक चेहरा म्हणजे रेखा सुधाकर रामटेके यांना गावातील जनतेनी एकजुटीने सहकार्य करून निवडून आणले.रेखा सुधाकर रामटेके यांचा व्यक्तिमत्व सुद्धा जनतेच्या हितासाठी असल्याचे दिसून येते.त्यांच्या प्रखर कर्तुत्व शैलीने त्या गावातच नाही तर तालुक्यात देखील सू परिचित आहेत.सुशिक्षित आणि अनुभवी अशी त्यांची ओळख असल्याने गावांनी त्यांना पसंती दिली. रेखा रामटेके यांनी प्रभागाच्या विकासात दिलेले योगदान महत्वपूर्ण असून,त्यांच्या इतर सामाजिक कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांची महीला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली.यावरून महिलांना राजकारणात महत्वाच्या पदाची संधी मिळाल्यास त्याही चांगल्या पद्धतीने काम करु शकतात हे सिद्ध झाले आहे.
या प्रसंगाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान संचालित विश्र्वशांती ग्राम सेवा संघ विठ्ठलवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक ४ जुलै ला नवनियुक्त अध्यक्ष्या रेखा रामटेके यांचा सत्कार समारंभा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान संचालित विश्र्वशांती ग्राम सेवा संघ विठ्ठलवाडा च्या महीला पदाधिकार्यां कडून रेखा रामटेके यांना साळी चोळी आणि पुष्गुच्छ देऊन गौरविण्यात आले.यावरून त्यांच्या पाठीशी तालुक्यातील प्रचंड महीला शक्ती उभी राहणार असे भाकीत होत आहे.
महिलाही राजकारणात आपल्या पदाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवू शकतात. त्यामुळे रेखा रामटेके या आपल्या संधीच्या माध्यमातून गावातील आणि तालुक्याच्या विकासात आपले बहुमोल योगदान देतील,असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या दर्शना दुर्गे यांनी यावेळी व्यक्त केल्या.नवनियुक्त महीला तालुका अध्यक्ष तथा ग्राम सदस्या रेखा रामटेके यांचा सत्कार माजी अध्यक्षा सुरेखा पिदुरकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कमला लोणारे सचिव, संघाच्या पदाधिकारी शैला चोपावार, वैशाली लोहकरे,अर्चना चंद्रगीरीवार, माधुरी रामटेके, पवार मॅडम आणि संघातील सदस्य महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारास बोलतांना रेखा रामटेके म्हणाल्या, ग्राम सदस्या म्हणून प्रभागातील विविध विकास कामांबरोबरच अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर राहणार. आता काँग्रेस पक्षाच्या महीला आघाडीचे अध्यक्ष पदाची संधी मिळाल्याने तालुक्यातील महिलांच्या न्याय हक्कासाठी झटून महिलांविषयी चे कोणतेही प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे प्रथम प्राधान्य असेल. विशेषत: महिलांसाठी शासनाच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्याचा मानस आहे.यात मला आपल्या विधानसभेचे आमदार सुभाष धोटे आणि जेष्ठ नेते खेमचंद गरपल्लिवार यांचे मार्गदर्शन राहिलीच असे बोलून सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे मनस्वी आभार मानले.