बीड जिल्हात शेतकरी महीलेच पहिले केल अपहरण मग केला बलात्कार.

✒श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड,दि.6 जुलै:- बीड जिल्हातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतातील काम संपवुन घरी जायलाक निघालेल्या विवाहित महिलेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात घाटेवाडी येथे शुक्रवारी घडली. याबाबत अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
क्रेज तालुक्यातील घाटेवाडी येथे राहणा-या एक विवाहित महिला शेतात काम करायला गेली होती. दिवस भर काम करुन सायंकाळच्या सुमारास काम संपवुन घरी जायला निघाली ती महिला एकटी असल्याच्या फायदा घेत नराधाम आरोपी फुलचंद रामभाऊ गायकवाड याने बळजबरीने पीडितेस त्याच्या चारचाकी गाडीत क्र. एमएच-06/बीई-3008 यात जबरदस्ती ने पकडून अपहरण केले. यावेळी आरोपीने पीडित शेतकरी महिलेला घाटेवाडी परिसरातील शिंदी फाट्याजवळ असलेल्या बाळू मामाच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या शिंदे यांच्या शेतात निर्मनुष्य ठिकाणी नेऊन बलात्कार केला.
तसेच या अत्याचाराबदल कुणाला सांगितल तर तुझा नवऱ्याला आणि मुलाला जीवे मारुन टाकण्याची धमकी आरोपीने शेतकरी विवाहित महिलेला दिली.
रविवारी दि.4 जुलै पीडित महिलेने तिच्यावर घडलेल्या अन्यायाची माहिती केज पोलीस ठाण्यात दिली. महिलेच्या तक्रारी वरुन फुलचंद गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी गुन्ह्या वापरलेल्या चार चाकी गाडीसह ताब्यात घेतले आहे.
क्रेज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा कोळी या पुढील तपास करीत आहे.