*पीक स्पर्धा हंगाम -20 जिल्हास्तरीय स्पर्धांचे निकाल जाहीर*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961
औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) – प्रयोगशील शेतकऱ्यांची इच्छाशक्ती, मनोबल उंचावण्यासाठी, तसेच त्यांची एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने कृषि विभागामार्फत राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविली जाते. सन 2020 च्या रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, जवस, तीळ व करडई या 6 पिकांसाठी आयोजीत करण्यात आल्या होत्या.तथापी जवस व तीळ या 2 पिकांसाठी स्पर्धक संख्या कमी असल्याने स्पर्धा झाल्या नाहीत. उर्वरित रब्बी ज्वारी, गहू हरभरा या चार पिकांसाठी जिल्ह्यामधून एकूण 149 स्पर्धक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यानुषंगाने सन 2020 च्या रब्बी हंगामाचा सर्वसाधारण गटासाठीचा निकाल 25 जून रोजी जिल्हास्तरीय पीकस्पर्धा समितीमार्फत निकाल घोषीत करण्यात आला.
रब्बी ज्वारी या पिकातील सर्वसाधारण जिल्हास्तरीय गटाच्या प्रर्वगामध्ये तान्हाजी बंडू भोसले मु.पो. कानेवाडी ता.जि. औरंगाबाद 38.65 क्विं / हे उत्पादन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मंदाबाई आगाजी भेरे मु.पो.कानेवाडी ता.जि.औरंगाबाद 36.15 क्विं / हे उत्पादन घेऊन व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कृष्णा गोपीनाथ पाखरे 16.00 क्विं, हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
रब्बी गहू या पिकातील सर्वसाधारण जिल्हास्तरीय गटाच्या प्रवर्गामध्ये गीताबाई ज्ञानदेव हजारे मु.पो.कुतुबखेडा ता.पैठन जि.औरंगाबाद यांनी 68.09 क्विं, हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रभाकर चंद्रभान गाढेकर मु. पो. बाबतारा ता.जि.औरंगाबाद 67.00 क्विं, हे उप्तादन घेऊन व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच ज्ञानेश्वर दिगंबर चिडे मु.पो. मुरमा ता. पैठन जि.औरंगाबाद यांनी 16.00 क्विं, हे उत्पादन घेऊन तृत्तीय क्रमांक प्राप्त केला आहे.
हरभरा या पिकातील सर्वसाधारण गटाच्या प्रवर्गामध्ये नारायण धामोधर भेसारे ता.गंगापूर जि.औरंगाबाद यांनी 30.00 क्विं, हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, पाडुरंग वामन दौंड यांनी 21.60 क्विं, हे उत्पादन घेऊन व्दितीय क्रमांक तर चंद्रकांत संपतराव दौंड यांनी 21.00 क्विं, हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या सर्व पीकस्पर्धा विजेते शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत प्रथम क्रमांकाला रक्क्म रु.10 हजार, व्दितीय क्रमाकांला रु.7 हजार आणि तृतीय क्रमाकांला रक्कम रु.5 हजार बक्षीस रक्कम मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.