नागपुर येथे महा अंनिस तर्फे कोरोना योद्धाचा सम्मान.

55

नागपुर येथे महा अंनिस तर्फे कोरोना योद्धाचा सम्मान                   

नागपुर येथे महा अंनिस तर्फे कोरोना योद्धाचा सम्मान.
नागपुर येथे महा अंनिस तर्फे कोरोना योद्धाचा सम्मान.

✒युवराज मेश्राम✒
              नागपुर जिल्हा प्रतिनिधी
95275 26914

नागपूर,दि.04ः- कोरोना वायरसच्या जागतिक महामारीने नागरिक भयाखाली जीवन जगत होते. मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाने संक्रमित होऊन अनेक लोक मयत झाले. त्यात अनेक कोरोना योद्ध्यानी आपल्या जीव धोक्यात घालुन रात्र दिवस कोरोना वायरस बाधित रुग्णांची सेवा दिली अशा कोरोना योद्ध्याचा सम्मान महा अंनीस उत्तर नागपुर शाखे कडुन करण्यात आला.

करोना महामारीच्या काळात ज्यांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता, प्रभावित जनतेची रुग्णांची व वंचितांची सेवा केली, अशा सर्व परिचारीका, आशा वर्कर्स, डाक्टर्स, रुग्ण व शववाहक, बॅंक कर्मचारी, सफाई कामगार इत्यादी ख-याखु-या देवदुतांना सम्मानित करण्यात महा अंनिस उत्तर नागपुर शाखा सदैव पुढाकार घेत आहे.

अशाच पन्नास सफाई कर्मचाऱ्यांसाठी लालशाळा बेझनबाग येथे कार्यक्रम आयोजित करुन त्यांना प्रमाणपत्र वितरण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते महेशजी शहारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जील्हा प्रधान सचिव रामभाऊ डोंगरे यांनी प्रस्तावनेत संबोधित केले की कोविड योद्धांचा सम्मान म्हणजेच सेवाकार्यांचा सम्मान असुन सत्कर्मांचा संचयच आहे.हे सेवाभावी कार्य आयुष्यांत कुठे न कुठे तुमचे कामी येतील असेही ते म्हणाले.

समाज सेवक महेश शहारे यांनी महा अंनिस उत्तर नागपुर शाखेच्या या कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी केले तर आभार नरेश महाजन वि . उपक्रम कार्यवाह यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाची सुरूवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक वाचनाने आनंद मामा मेश्राम यांनी केली. तर समारोप सफाई जमादार दिनेश करोशियां यांच्या सत्काराला प्रतिक्रीये ने संपन्न झाले.

या प्रसंगी रंजना ठवरे, अल्का लाडे, छबुताई गजभिये, कविता रामटेके, सुनिता गजभिये, माधुरी मेश्राम, मनिषा बौद्ध, रमेश ढवळे, जयराज टेंभुर्णे, चरणदास गजभिये, चंद्रशेखर मेश्राम, शशांक चणकापुरे, आशुतोष टेंभुर्णे, अशोक राऊत, गौतम मघाडे, हरीश वासनिक, विप्लव मेश्राम व परीसरातील नागरीक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.