निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्याचा धुमाकूळ ॲड.धारकर यांना शिवीगाळ

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट 06/07/2021येथील निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्याने आज दारूच्या नशेत कार्यालयात धुमाकूळ घातला.
मानसिक त्रासाला कंटाळून अनेकांना शिविगाळ केली,काही वकिलांनी केलेल्या तक्रारी नंतर सदर व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
निबंधक कार्यलय येथील ॲड.स्वप्नील धारकर हे काही कामानिमित्ताने गेले असता त्यांना या कार्यालयातील कर्मचारी उमेश नवनाथे याने त्रासाला कंटाळून शिवीगाळ केली.
ॲड.धारकर यांनी त्वरित या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवनाथे या कर्मचारी विरोधात पोलिसात तक्रार केली.पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 294,324,506 या कलमा खाली गुन्हा नोंदविलेला आहे.