पक्षाचे संघटन मजबूत करा!* शाहीन भाभी हकीम यांचे वक्तव्य *एटापल्लीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कार्यकारिणी गठीत* *एटापल्ली तालुक अध्यक्षपदी ललीता दुलसा मडावी तर शहराध्यक्ष पदी पौर्णिमा श्रीरामवार यांची नियुक्ती*

*पक्षाचे संघटन मजबूत करा!*
शाहीन भाभी हकीम यांचे वक्तव्य
*एटापल्लीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कार्यकारिणी गठीत*

*एटापल्ली तालुक अध्यक्षपदी ललीता दुलसा मडावी तर शहराध्यक्ष पदी पौर्णिमा श्रीरामवार यांची नियुक्ती*

पक्षाचे संघटन मजबूत करा!* शाहीन भाभी हकीम यांचे वक्तव्य *एटापल्लीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कार्यकारिणी गठीत* *एटापल्ली तालुक अध्यक्षपदी ललीता दुलसा मडावी तर शहराध्यक्ष पदी पौर्णिमा श्रीरामवार यांची नियुक्ती*
पक्षाचे संघटन मजबूत करा!*
शाहीन भाभी हकीम यांचे वक्तव्य
*एटापल्लीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कार्यकारिणी गठीत*
*एटापल्ली तालुक अध्यक्षपदी ललीता दुलसा मडावी तर शहराध्यक्ष पदी पौर्णिमा श्रीरामवार यांची नियुक्ती*

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज

*एटापल्ली:*- राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका कार्यकारिणीची बैठक येथील राजीव गांधी हायस्कुल, एटापल्ली येथे पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम होते तर मंचावर जिल्हा परिषद सदस्या ग्यानकुमारी कौशिक, रा.काँ चे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, विनोद पत्तीवार, कौशी सर, बेबीताई लेकामी, सपनाताई कोडापे, ममता पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एटापल्ली तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ. ललिता मडावी तर शहराध्यक्ष पदी सौ. पौर्णिमा श्रीरामवार यांची सर्वानुमते व एकमताने निवड करण्यात आली. तसेच तालुका उपाध्यक्ष तथा जारावंडी जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख पदी सपनाताई कोडापे यांची निवड करण्यात आली.
यावेळी शाहीन भाभी हकीम यांनी नवनियुक्त अध्यक्षांना नियुक्तीपत्र व गुलदस्ते देऊन व गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुप्पटा टाकून स्वागत केले व पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून शाहीन भाभी हकीम यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामुख्याने महिलांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याचे पक्ष असून पक्षाचे विचार प्रत्येक घरा-घरात व तळागाळात पोहचणे आवश्यक असून आमदार धर्मराव बाबा आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे सक्षम व मजबूत नेतृत्व आपल्याला लाभले असून पक्षाच्या व आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन मजबूत करून आपल्या व पक्षाच्या हितासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन शाहीन भाभी हकीम यांनी केले.
प्रास्ताविक सपनाताई कोडापे यांनी तर संचालन श्रीकांत कोकुलवार व सुरेंद्र अलोने यांनी केले. उपस्थितांचे आभार निरर्मला गावडे यांनी मानले. यावेळी रा..काग्रेसचे युवती व महिला उपस्थित होते…