*योजनांच्या लाभासाठी बनावट ‘टीसी चे रॅकेट’*
*तहसील कडून पडताळणी: नगर परिषद शाळांचा अहवाल*

✒साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यू-9309747836
यवतमाळ : -योजनांचा लाभ घेण्यासाठी शाळा सोडल्याचे( टीसी) बनावट दाखले सादर करण्यात आल्याचे येथे उघड झाले आहे तहसील विभागाची सतर्कता आणि नगर परिषद शाळांची तत्परता यामुळे हा प्रकार पुढे आला आहे अजूनही दाखल्यांची पडताळणी केली जात आहे किती लोकांनी बनावट दाखले सादर केले हे शोधण्याचे आवाहन तहसील प्रशासनापुढे आहे.
यवतमाळ तहसील कार्यालय अंतर्गत नगर परिषद क्षेत्रातील लोकांकडून श्रावण बाळ योजनेच्या लाभासाठी अर्ज दाखल करण्यात आली आहे या साठी शाळा सोडल्याचा दाखला मागविण्यात आला दाखल झालेल्या काही दाखल्या याविषयी तहसील प्रशासनाला संशय आला त्यामुळे ज्या शाळा यांचा दाखला आहे त्याचा डान्स कधी काही दाखले पडताळण्यासाठी पाठविण्यात आले.
पडताळणीसाठी पाठविण्यात आलेले दाखले आमच्या शाळेतून दिलेच नसल्याचे स्पष्टीकरण काही शाळांनी दिले आहे.
बनावट दाखले देणारी टोळी शहरात सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट झाले मात्र या प्रकारात गरजू लोकांची आर्थिक लूट होण्यासोबतच फसवणूक होत आहे सादर केलेल्या दाखल्यांमध्ये अनेक बाबी संशय आला जागा करून देणाऱ्याआहे दाखल्याचा नमुना हुबेहूब शाळा कडून दिलेल्या प्रमाणे आहे मात्र त्यात माहिती भरताना अनेक चुका ठेवण्यात आलेले आहेत