पेट्रोल डीजल दरवाढीच्या निषेधार्थ नाना पटोले व सुनील केदार यांचे भर पावसात सायकल आंदोलन.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि 8 जुलै:- देशात हररोज मोठ्या प्रमाणात पेट्रोल डीजलची दरवाढ होत आहे आणि केंद्र सरकार गरिबाची मजा पहात आहे अशी स्थिती सर्वीकडे दिसून येत आहे यामुळे सर्वीकडे केंद्र सरकार विरुध्द मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून येत आहे.
माघील अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डीजलच्या किंमती सातत्याने वाढत आहे. आता तर पेट्रोलने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी गुरूवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसात सायकली चालवून आपला निषेध नोंदवला. त्यांचे हे अनोखे सायकल आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी पावसात भिजत एकच गर्दी केली होती.
गुरुवारी दि.8 जुलै ला दुपारी 12 वाजताच्या सुमारास संविधान चौकातून या आंदोलनाला सुरुवात झाली. पेट्रोलदरवाढीच्या निषेधार्थ घोषणा देत नाना पटोले व सुनील केदार यांनी आपला सायकल मार्च चालू केला. यावेळी विकास ठाकरे, अभिजित वंजारी व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.