कोल्हापुर भाच्याने मावशीला फसवल, 25 लाख आणि 25 तोळे सोन्याची फसवणुक.

कोल्हापुर भाच्याने मावशीला फसवल, 25 लाख आणि 25 तोळे सोन्याची फसवणुक.

कोल्हापुर भाच्याने मावशीला फसवल, 25 लाख आणि 25 तोळे सोन्याची फसवणुक.
कोल्हापुर भाच्याने मावशीला फसवल, 25 लाख आणि 25 तोळे सोन्याची फसवणुक.

लियाकत मदारी✒
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी
99603 65075
कोल्हापूर,दि.5 जुलै:- कोल्हापुर येथे भाच्याने स्वता:च्या मावशीची फसवुन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने अनेक वेळा स्वता:च्या मावशी जवळुन एकुण 25 लाख 17 हजार रुपये घेतले आणि त्याबरोबर 25 तोळे सोन्याचे दागिने परस्पर ग्राहाण ठेवून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. याबाबतची फिर्याद छाया राजाराम चव्हाण, राह. राहूल हॉटेलमागे, फुलेवाडी यांनी करवीर पोलिसांत संशयित निलेश राजकुमार पाटील रा. बुधवार पेठ, ढिसाळ गल्ली भाच्याविरोधात सोमवारी तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रार नोंद गुन्हा दाखल केला आहे. दिली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संशयित आरोपी निलेश राजकुमार पाटील हा फिर्यादी छाया यांच्या बहीणाचा मुलगा आहे. त्याने तो स्वत: काम करत असलेल्या अनघालक्ष्मी स्टॉक ब्रोकिंग प्रा.लि. नावाचे कंपनीत पैसे व सोने गुंतवा असे मावशीस सांगितले. त्यानूसार प्रत्यक्षात मावशीकडून वेळोवेळी घेतलेले 25 लाख 17 हजार रुपये घेतले. त्यासोबतच गरजेसाठी त्यांचे नावे गहाण ठेवलेले 25 तोळे सोने दागिने परस्पर विकून मावशीचा विश्वासघात करून फसवणूक केली. याबाबत फिर्यादीने करवीर पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. चौकशीत फसवणूक झाल्याचे पुढे आले. त्यामुळे फिर्यादी छाया यांनी संशयिताविरोधात फिर्याद दिली. त्यानूसार करवीर पोलिसांनी संशयित निलेश विरोधात गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास पोलीस करित आहे.