भद्रावती शहरातील रास्त भाव दुकानांवर जप्तीची कार्यवाही

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
भद्रावती : रास्त भाव दुकानात धान्य कमी मिळत असल्याबाबतच्या तक्रारीवरून ग्राहक पंचायत भद्रावती यांनी दि. २८/०६/२०२१ रोजी मा. उप नियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग चंद्रपूर ह. तु. बोकडे यांच्या कडे पत्रा व्दारे रास्त भाव दुकानात होत असलेल्या प्रकाराबद्दलची माहीती सादर करण्यात आली होती.
त्या तक्रारीची दखल आज दि.०७/०७/२०२१ रोजी वरोरा येथील वैध मापन शास्त्र अधिकारी सुनिल वाडे साहेब आणि ग्राहक पंचायत भद्रावती यांचेकडुन संयुक्तपणे भद्रावती शहरातील पाच रास्त भाव दुकानाची तपासणी करण्यात आली.
तपासणी करतांना वजन तराजु प्रमाणपत्र, लायसन्स, उपयोगात असलेल्या तराजुचे पासन याचे निरीक्षण करण्यात आले. तपासणीत असे आढळुन आले की, एक रास्त भाव दुकानदाराने वजन तराजु प्रमाणपत्र प्रदर्शित केले नव्हते, एक दुकानदाराकडे पासींग केलेल्या वजन व्यतिरिक्त दोन वजने पासिंग न करता तराजु जवळ वापरण्या हेतुने तराजु जवळ ठेवले होते. एक रास्त दुकानदाराच्या पारड्यात अंदाजे १०० ग्रॅम वजनाचा फरक आढळुन आला. बऱ्याच राशन दुकानावर बोर्ड नाही, धान्याची माहीती, त्यांच्या किंमती असलेले फलक नाही. राशन दुकानाचा वेळ आणि दुकानदाराचे नंबर नाही. येवढंच नाही तर काही दुकानात लायसन्स ची कॉपी पण लावुन नाही.
शहरातील तपासणी केलेल्या पाच रास्त भाव दुकानांपैकी तिन रास्त भाव दुकानां विरूद्ध जप्तीची कार्यवाही करण्यात आली. वैध मापन शास्त्र अधिकारी सुनिल वाडे साहेब यांच्या कार्यालयाकडून सात दिवसाच्या आत आढळुन आलेले दोष दुर करण्याचे कळविले आहे. दोष दुर केल्यानंतरच धान्य विक्री करण्यात यावे असे सक्त निर्देश देण्यात आले. अन्यथा पुढिल कार्यवाहीचा इशारा देण्यात आला.
आज झालेली तपासणी मोहीम वैध मापन शास्त्र अधिकारी सुनिल वाडे साहेब, वसंत वर्हाटे, पुरुषोत्तम मत्ते, गुलाब लोणारे, अशोक शेंडे आणि प्रविण चिमुरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
भद्रावती शहरातील संपूर्ण शिधापत्रिका धारकाना आणि इतर ग्राहकांना ग्राहक पंचायत यांच्या कडुन आव्हाहन करण्यात येत आहे की, ग्राहकांनो जागृक व्हा. आपली फसवणुक होणार नाही याची काळजी घ्या. धान्य व इतर सामान खरेदी करतांना वजन काटा तपासा, सामानावरची तारिख चेक करा, सामानाचे बिल, गॅरंटीकार्ड सांभाळुण ठेवा. वस्तु विकत घेतल्यानंतर सेवा देण्यास कोणताही दुकानदार टाळाटाळ करीत असेल तर ग्राहक पंचायतच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा.