शिवसेना नेत्यापुढे पदाधिकार्यांत धक्काबुक्की

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा 09/07/2021
शिवसेना युवा नेते ना. आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतून व्हेंटीलेटर वाटण्याच्या कार्यक्रमासाठी उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत आज 9 रोजी वर्ध्यात आले. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांचा गराडा जमा झाला. कार्यकर्ते निवेदनं देत असतानाच हिंगणघाट येथील सीताराम भुतेही निवेदन देण्यासाठी गेले असता शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्यात धक्काबुक्की झाल्याची जोरदार चर्चा वर्ध्यात रंगली. सीताराम भुते यांनी आपल्याला धक्काबुक्की झाल्याचे सांगितले तर गुढे यांनी असे काहीच झाले नसल्याचे म्हणाले.
वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेत अंतर्गत धूसफुस सुल आहे. दरम्यान, हिंगणघाट येथील भाजपाचे 9 आणि 1 अपक्ष नगरसेवक फोडण्यात अनंत गुढे यांना यश आले असले तरी तेथील जुने शिवसैनिक व माजी मंत्री अशोक शिंदे यांना डावल्यात आल्याने जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे तर जिल्हा संपर्क प्रमुख हा जिल्ह्यातलाच असावा अशीही मागणी काहींची होती. एकंदरीत शिवसेनेतील दोन गट दिवसेंदिवस आमने सामने येत असताना आज राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या पुढेच हिंगणघाटचे सीताराम भुते आणि जिल्हा संपर्क प्रमुख माजी खा. अनंत गुढे यांच्यात धक्काबुक्की झाली.
आपण ना. सामंत यांच्यासोबत निवेदन देऊन चर्चा करीत असताना वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख अनंत घुडे यांनी आपल्याला बोलू दिले नाही व मी असतांना मंत्र्यासोबत का बोलता असे म्हणून धक्का बुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचे सीताराम भूते यांचे म्हणणे आहे. या संदर्भात जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, सीताराम भूते ना. सामंत यांच्यासोबत बोलत असताना सामंत यांनीच भूते यांना म “सीताराम भूते यांचे म्हणणे आहे. या संदर्भात जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, सीताराम भूते यांनी मुखाच्छादन नसल्याचे ना. सावंत यांना सांगितले. त्यावेळी तेथे एवढीच चर्चा झाली. आपल्यासोबत ते बोललेही नाहीत आणि आपणही त्यांच्यासोबत बोललो नाही. मुळात भूते शिवसैनिकच नसल्याचे गुढे यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यात शिवसेना वाढत असल्याने काहींच्या पोटात दुखत असल्याने हा अपप्रचार सुरू झाल्याचे गुढे म्हणाले.