चळवळीतील ख्यातनाम गायिका स्वरा दीदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवीण्यात आले.

✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट,दि.10जुलै:- फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील ख्यातनाम गायिका ज्या आपल्या गायनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार संपूर्ण भारतात पोहोचवत आहे व ज्यांच्या गायनाने हिंगणघाट शहराचे नाव संपूर्ण भारतात रोशन करत आहे, अशा हिंगणघाट शहरातील नामवंत गायिका स्वरा दीदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 10 जुलै रोज शनिवार ला सामाजिक कार्यकर्त्यांनी हिंगणघाट शहरातील गरजू मुला-मुलींना कपडे व खाऊ भेट देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळेस कवी स्वप्नील तामगाडगे, अक्षय वडार, प्रीत ढोरे, मंगेश चौधरी, प्रज्योत लीहितकर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.