खळबळजनक: कोरोना आणि डेल्टा प्लस नंतर आता झिका विषाणूची एंट्री.

✒नीलम खरात✒
मुंबई नगर प्रतिनिधी
9136879930
मुंबई,दि.10 जुलै:- कोरोना वायरस महामारीने संपुर्ण देशाला भयभीत केल आहे. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशा स्थितीत आता झिका विषाणूनं एंट्री घेतल्याने देशातील लोकाच्या मनात अजुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळमध्ये आतापर्यंत 13 जणांना झिकाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात एका गर्भवती महिलेच्या पण समावेश आहे. तिरुअनंतपुरमधून घेण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्रातील पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत.
केरळच्या तिरुअनंतपुरम मधील एका खासगी रुग्णालयात 28 जूनला एका 24 वर्षीय गर्भवती महिलेला दाखल करण्यात आलं. या गर्भवती महिलेला मोठ्या प्रमाणात ताप, डोकेदुखी, शरीरावर लाल चट्टे अशा स्वरुपाचे लक्षण दिसत होते. हे लक्षणं असल्यानं आरोग्य विभागाने पुण्यातील प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात पाठवले. झिकाची लागण झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केरळच्या आरोग्य विभागाने दिली.
● लक्षण दिसायला लगतो वेळ ●
झिका या धोकादायक विषाणूची लक्षणं दिसायला 3 ते 14 दिवस लागतात. अनेक झिका विषाणूनं बांधीत लोकांमध्ये लक्षणंदेखील दिसत नाहीत. काही लोकांना ताप, शरीरावर चट्टे, डोकेदुखी, मांसपेशी आणि सांधेदुखीची मोठ्या प्रमाणात समस्या जाणवते.
● झिका विषाणूनं मुळ ●
जगात पहिल्यांदा युगांडातील माकडांमध्ये सापडला होता झिका विषाणू जागतिक आरोग्य संघटनेकडे असलेल्या नोंदीनुसार, झिका विषाणू एडीज डास चावल्यानं पसरतो. हे डास संध्याकाळी जास्त सक्रीय असतात. युगांडात पहिल्यांदा 1947 मध्ये माकडांमध्ये झिका विषाणू सापडला. यानंतर 1952 मध्ये युगांडा आणि टांझानियात माणसांना या विषाणूची लागण झाली. आशिया, आफ्रिका, अमेरिका, पॅसिफिक महासागरातील बेटांवर आतापर्यंत हजारोच्या वर झिका विषाणूने बांधीत रुग्ण सापडले आहेत.