बापच झाला हैवान, आईने बापाला मुली बरोबर लग्नास दिला नकार, बापाने मुलीला पळवल.

MVN क्राईम रिपोर्टर
इंदोर,दि.9 जुलै:- मध्य प्रदेश मधील इंदोर मधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. इंदोर येथील एका नराधम सावत्र बापाला आपल्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा झाली. त्यातून त्या नराधम सावत्र बापाने आपल्या मुलीला पळवून नेले. या घटणेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आहे.
जेव्हा मुलीच्या आईला आपली मुलगी ही आपल्या सावत्र वडीला बरोबर पळाली माहित झाल तिने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. पोलिस या आरोपीच्या शोधात आहेत.
15 दिवसापुर्वी मुलीच्या आई बरोबर नराधम आरोपी बापाने प्रेम विवाह केला होता. मुलिचा आई बरोबर लग्नाच्या अवघ्या 15 दिवसानंतरच या नराधम व्यक्तीचं विचार परिवर्तन झालं आणि त्याच्या मनात आपल्या सावत्र मुलीशी लग्न करण्याचा विचार आला. यानंतर त्या महिलेच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरला. काही दिवसांनंतर त्याने तिच्या मुलीला पळवून नेले, आता ही महिला पोलिसांकडे आली आहे आणि तिची मुलगी शोधण्याची विनंती केली.
तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाक’, असे सांगून विवाहित महिलेने मुलीपासून संतोषला दूर करण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला हे पटले नाही. तिच्या समजावण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. अखेर आरोपी संतोषने सोमवारी रात्री पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले. या घटनेनंतर मुलगी हरवल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत केली. पोलिसांनी आरोपी संतोष सिंहवर मुलीला पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपी संतोष आणि त्याने पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेत आहेत. प्रकरण घरगुती वादाचे असले तरी मुलीशी संबंधित असल्याने चौकशी करून शोध घेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.