मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या.

✒साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
9309747836
यवतमाल,दि.11 जुलै:- यवतमाल जिल्हातील मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका शेतकऱ्याने विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे.
दिनकर पुंडलिक बोन्द्रे वय 55 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी, कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
दिनकर बोन्द्रे यांच्या पाठमागे पत्नी, दोन मुले व आई असा बराच मोठा आप्त परिवार पाठिमागे आहे. मात्र, मारेगाव तालुक्यातील गेल्या आठवड्या पासून आत्महत्या चे सत्र सुरूच असून याला थांबा कधी मिळेल असे मत व्यक्त होत आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. शेतकरी त्याच्या जवळ होते नव्हते ते सर्व शेतात पेरणी, नागरणी, बियाने यात गुतवल आहे. आता बळीराज्या जवळ कहीच शिल्लक नसल्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. सरकारने उपाय करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवली पाहीजे असे मत गावतील अनेक शेतक-यांनी मिडिया वार्ता न्यूज़ जवळ व्यक्त केल आहे.