दारूबंदी हटाव वर्धा बचाओ आंदोलनाची दुसरी बैठक

दारूबंदी हटाव वर्धा बचाओ आंदोलनाची दुसरी बैठक

दारूबंदी हटाव वर्धा बचाओ आंदोलनाची दुसरी बैठक
दारूबंदी हटाव वर्धा बचाओ आंदोलनाची दुसरी बैठक

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

दारूबंदी हटाव, वर्धा बचाव आंदोलनाची बहुप्रतिक्षित दुसरी बैठक *रविवार दिनांक ११ जुलै २०२१ ला शासकीय विश्रामगृह, वर्धा येथे सकाळी १०.१५ ला होणार आहे.*
बैठकीत पुढील वाटचालीवर सविस्तर चर्चा केली जाणार असून जिल्हास्तरीय कार्यकारिणी देखील निवडली जाईल. पहिल्या बैठकीत ज्यांना येणे शक्य झाले नाही, त्या सर्वांना ह्या बैठकीत सहभागी होणे व आपले मत नोंदविणे आवश्यक आहे.
दारूबंदी हटाव आंदोलन दारू पिण्याच्या अधिकाराचे आंदोलन नसून सक्षम अर्थव्यवस्था बनविण्याचे आंदोलन आहे. दारूबंदी लादणे हे अनैसर्गिक व अन्याय्य असून दारूबंदीने वर्धा जिल्ह्यात फार मोठे आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक प्रश्न निर्माण झाले आहे. गेल्या 5 पिढ्यांचे प्रचंड नुकसान दारूबंदीने केले असून पश्चिम महाराष्ट्राच्या विदर्भ द्वेषाचे आणि विदर्भाला मागास ठेवण्याच्या षडयंत्राचे हे सर्वात चपखल उदाहरण आहे.
बऱ्याच लोकांना हा विषय फक्त जोक शेअर करण्यापूरता किंवा दारू प्यायला मिळावी इतका क्षुल्लक वाटत असेल, पण आम्ही मात्र ह्याकडे वास्तविकव व्यावहारिक नजरेने बघतो. जे गंभीर नाहीत, त्यांनी एकदा येउन ह्या विषयाचे गांभीर्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे.
बैठक सर्वांकरिता खुली आहे. कृपया सर्वांनी राजकीय विचारधारा, धर्म, जात वगैरे चष्मे काढूनच ह्या बैठकीत सहभागी व्हावे. राजकीय पक्षांमध्ये किंवा राजकीय पुढाऱ्यांमध्ये आजतरी सत्य सांगण्याचे किंवा सत्यासाठी लढण्याचे धाडस दिसत नाही, त्यामुळे आपण सर्वजण सामूहिकरीत्या ह्या आंदोलनाचे नेतृत्व करू या.
कृपया हा मेसेज जास्तीतजास्त वर्धेकरांपर्यंत शेअर करा.
*दारूबंदी हटाव वर्धा बचाव आंदोलन समिती*