रानातली वाट” पुस्तक प्रकाशन समारंभ साजरा, आदिवासी गोंड (आयपीएस ) पोलीस अधिकाऱ्याची यशोगाथा.

रानातली वाट” पुस्तक प्रकाशन समारंभ साजरा, आदिवासी गोंड (आयपीएस ) पोलीस अधिकाऱ्याची यशोगाथा.

रानातली वाट" पुस्तक प्रकाशन समारंभ साजरा, आदिवासी गोंड (आयपीएस ) पोलीस अधिकाऱ्याची यशोगाथा.
रानातली वाट” पुस्तक प्रकाशन समारंभ साजरा, आदिवासी गोंड (आयपीएस ) पोलीस अधिकाऱ्याची यशोगाथा.

मुकेश चौधरी✒
विदर्भ ब्युरो चीफ
7507130263

वर्धा,दि.11 जुलै:- वर्धा जिल्हाच्या आष्टी तालुक्यातील लिंगापुर या छोट्याशा गावात आदिवासी कुटुंबात जन्मलेले पहीले एकमेव (सेवानिवृत्त) आयपीएस पोलीस अधिकारी श्री. बाबासाहेब कंगाले लिखीत रानातील वाट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नागपूर येथे राजे वासुदेव शहा टेकाम यांचे हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर शारदाताई ईवनाथे प्रमुख पाहूने म्हणून मधुकरराव उईके अ. भा. आ. कर्म. संघ विनोद कुमरे मुंबई, शितल मरकाम, श्रीमती रिनाताई कंगाले, आय.ए.एस चीफ़ इलेक्ट्रॉल ऑफिसर छत्तीसगड विपिनकुमार कंगाले प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मान्यरांनी बाबासाहेब कंगाले व यांचे कुटुंबीयांचे कौतुक करून त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला असल्याचे सांगुन, आदिवासी समाजात अजूनही आर्थिक, शैक्षणिक समानता नाही म्हणून आदिवासीना युवकांना विकासाच्या वाटा आपल्याला शोधाव्या लागणार आहे. आघुनिक जगात जगण्यासाठी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समाज उद्धार कारणारा मंत्र प्रत्येकाने अंगीकारून आदिवासी विकास घडवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

याप्रसंगी समाज बांधवांच्या वतीने बाबासाहेब कंगाले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी बाबासाहेब कंगाले व त्यांची कन्या रिनाताई कंगाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.बाबासाहेब कंगाले यांच्या “रानातील वाट” साहित्यातून आदिवासी माणसांचे प्रश्न,त्याच
वेदना, संवेदना, संघर्ष, त्यांचे दु:ख त्याच बरोबर, आदिवासी समाज विकासासाठी प्रयत्न त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे. बाबासाहेब कंगाले यांच्या या असामान्य कार्याबद्दल डॉ. शरद मोहोड, डॉ. कल्यानी कौस्तुभ पाटील, प्रा.सौ.साधना मोहोड सह अनेकांनी सत्कार केला. प्रकाशराव मुंगसे, नारायणदास चांडक, डॉ. नरेंद्र देशमुख, पोलीस पाटील नंदकिशोर मोहोड, सह अनेकांनी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.