*’आनंदी गुरुकुल’चे विद्यार्थी आणि यवतमाळचे सुपुत्र पवनपुत्र चव्हाण आणि अनिकेत गौरकारची उत्तरप्रदेशातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये भरारी….

साहिल महाजन
मीडिया वार्ता न्यूज यवतमाळ
9309747836
यवतमाळ जिल्ह्यातील दहेली तांडा येथील युवा कलाकार तथा प्रा.दीपाली आतिश सोसे यांनी अकोला येथील स्थापन केलेल्या आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अकॅडमी,अकोला चे हरहुन्नरी विद्यार्थी पवनपुत्र चव्हाण तसेच सोनबर्डी येथील अनिकेत गौरकार या दोघांनी नुकतीच उत्तरप्रदेश राज्यामध्ये सुरु असलेल्या “कोंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल”मध्ये बहारदार नृत्य व मराठी भाषेतील तीन नाट्यछटा सादर करुन जगभरातील रसिक-प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
प्रा.दीपाली सोसे या गुरुंकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन अनिकेत गौरकार आणि पवनपुत्र चव्हाण या दोन्ही विद्यार्थ्यांनी यापूर्वी ‘लस घ्या,सुरक्षित राहा’ या सामाजिक लघुपटामध्ये प्रमुख भुमिका करुन अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते या लघुपटाचे प्रकाशन करुन त्यांनी या दोघांचे विशेष कौतुक केले होते.
अनिकेत आणि पवनपुत्र हे लवकरच ‘मी मराठी’या ध्वनीफितीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.या दोन्ही कलाकारांचे आप्तस्वकीय व मित्रमंडळींने अभिनंदन केले आहे.