मीरा रोड मध्ये घरामध्ये चालत होता अवैध जुगार अड्डा, पोलिसांनी केली कारवाई.

✒अभिजीत सकपाळ✒
भिवंडी ठाणे प्रतिनिधी
9960096076
मुंबई/मीरारोड,दि.12 जुलै:- मुंबईच्या मीरा रोड पेरिसरातील काशीमीरा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणा-या एक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध जुगार अड्डावर पोलिसांनी धाड आरोपीना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला 10 जुलै रोजी माहिती मिळाली की बी-501, चैतन्य अरुणोदय हाईट, डॉन बास्को रोड, मीरागाव येथे घरामध्ये अवैध जुगार सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील, विजय निलंगे , रामचंद्र पाटील, वैष्णवी यंबर, कमल चव्हाण तसेच काशीमीरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मुल्ला, जरग आणि राकडे यांनी छापा टाकला. घरामध्ये 10 स्त्री – पुरुष पैसे लावून तीन पत्त्यांचा जुगार खेळताना सापडले. त्यावेळी त्यांच्याकडून 10 पत्यांचे कॅट व रोख रक्कम 34 हजार 430 रुपये मिळून आली आहे.