संविधान पूल नामांतराचा ठराव पारित करावा; विद्रोही पॅंथर व छञपती फाउंडेशनची मागणी.

सतीश म्हस्के✒
जालना जिल्हा प्रतिनिधी
मो 9765229010
जालना,दि.12 जुलै:- जालना नवीन व जुना जालना भागास जोडणाऱ्या पुलाचे संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेने ” संविधान पुल “नामकरण केले असून तसे नामांतर करण्याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करावा .अशी मागणी विद्रोही पॅंथर व छञपती फाउंडेशन या सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात विद्रोही चे संस्थापक अध्यक्ष कपिल खरात, छञपती फाउंडेशन चे सुनील रत्नपारखे व विद्रोही चे सचिव संदीप साबळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगीता ताई गोरंट्याल यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. जीर्ण झालेल्या ब्रिटिश राजवटीतील पुलाचे नुतनीकरण पुर्ण झाले असून जुना जालना भागाच्या टोकावर संविधान स्तंभ असल्याने सदर पुलास लोखंडी पुलाऐवजी ” संविधान पुल ” नांव दिले जावे अशी सर्व आंबेडकरी जनतेची मागणी होती. तसे नामफलक संविधान प्रेमी नागरिकांनी लावल्याचे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले.

दरम्यान नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ” संविधान पुल” नामांतराचा ठराव मांडून पारित करावा अशी मागणी लेखी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी विद्रोही पँथर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपिल खरात, सचिव संदीप साबळे, मराठवाडा अध्यक्ष भास्कर बोर्डे, उपाध्यक्ष राहुल खरात, राहुल उघडे, शहराध्यक्ष विशाल तेझाड, माधव जाधव, आदींची उपस्थिती होती.