*प्रकल्पाच्या आड अधिककाळ पुनर्वसनाचा प्रश्न नको; खैरी( ढालगाव )चा प्रश्न कालबद्धेत पूर्ण करा: सुनील केदार*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961
नागपूर दि. १२ : कन्हान नदीवरील कोच्छी बॅरेज प्रकल्प पूर्ण झाल्याने नागपूर शहरासह पेंच प्रकल्पातील सिंचित क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे.त्यामुळे या प्रकल्पाआड येणाऱ्या खैरी ( ढालगाव ) पुनर्वसनाचा प्रश्न कालबद्धेत पूर्ण करा, असे आवाहन पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहांमध्ये आयोजित बैठकीमध्ये हे या प्रकल्पा संदर्भातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांचा आढावा आज त्यांनी घेतला.या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी आर. विमला, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, कार्यकारी अभियंता अनिता पराते, जि.प. सदस्य छाया बनसिंगे आदी उपस्थित होते.
नागपूर शहराच्या परिघात वाहणारी महत्वाची नदी असून जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात कोची गावाजवळ बॅरेज बांधकामाधीन आहे. या बॅरेज मुळे पेन्च प्रकल्पातून वंचित असलेले ४४३५ हेक्टर सिंचन क्षेत्र पुन्हा सिंचित होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात येणाऱ्या कोच्छी, ढालगाव ( खैरी), रायवाडी ( जुनी ) या गावांचे पुनर्वसन आवश्यक आहे. जून 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे पुनर्वसनासंदर्भातअनेक कामे प्रलंबित असून तातडीने यासंदर्भात प्रशासनाने नियोजन करावे, असे आदेश केदार यांनी आज दिले. पुनर्वसन संदर्भातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
ढालगाव (खैरी ) गावाच्या पारडी ( रिठी ) पुनर्वसनासाठी आवश्यक 45.55 हेक्टर जमिनीच्या खरेदीच्या कारवाईसाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी यांना केली. तर त्याच अनुषंगाने जमीन खरेदीसाठी दर निश्चिती करण्यासाठी आवश्यक गुणांक ठरविण्यासाठी तसेच ढालगाव खैरी गावाच्या ग्रामस्थांना आवश्यक भूखंडाचा साठी लेआउट तातडीने तयार करण्याच्या सूचना नगररचना विभागाला देण्यात आल्या. पुढील आठवड्यात या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले.