*रेल्वे लाईन टाकण्याची मागणी*
वडसा ते गडचिरोली व सुरजागड पर्यंत
मा.आ.धर्मराव बाबा आत्राम यांची रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा*

वडसा ते गडचिरोली व सुरजागड पर्यंत
मा.आ.धर्मराव बाबा आत्राम यांची रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा*
गडचिरोली जिल्ह्य ग्रामीण
प्रतिनिधी मारोती कांबळे
मो.९४०५७२०५९३
*-* गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण वडसा वगळले तर रेल्वे लाईन कुठेच नाही, त्यामुळे वडसा ते गडचिरोली व गडचिरोली ते सुरजागड रेल्वे लाईन टाकण्यात यावे अशी मागणी भारत सरकारचे नवनियुक्त रेल्वे व इलेक्ट्रॉनिक, सूचना-प्रोद्योगिक मंत्री, ना. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केले आहे.
रेल्वे मंत्री यांच्याकडे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी, पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे लाईन नसल्यामुळे भाग दुर्लक्षित आहे, रेल्वे लाईन आले की, व्यापार, वाणिज्य, उद्योग वाढू शकतो. तदवतच औद्योगिक क्षेत्राकडे वाटचाल होऊ शकते त्यामूळे जिल्ह्यात रेल्वेचे जाळे उभारणे आवश्यक असून तात्काळ गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे लाईन टाकण्यात यावे अशी तीव्र व एकमुखी मागणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.
वडसा ते गडचिरोली येथून सुरजागड तसेच सुरजागड वरून सिरोंचा, मंचेरीयाल आणि आलापल्ली , अहेरी वरून थेट कागजनगर पर्यंत रेल्वे लाईन टाकण्यात यावे अशी मागणी मा.आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.