*बामणीत बिबट्याच्या हमल्यात ईसम जखमी कोठारी वनपरीक्षेत्रातील घटना*

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
कोठारी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बामणी ( काठवली ) येथील मनोहर बुद्धाजी मडावी या ईसमावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे यामुळे परीसरातील नागरीकांत भितीचे वातावरण दहशत पसरली आहे
कोठारी येथून अवघ्या तीन की मी असलेल्या बामणी ( काठवली ) क्षेत्रात वाघ आणि बिबट्याच्या संचार वाढला असून गावात तसेच सेतशीवारात ईत्तरही वन्य प्राण्यांचे दर्शन झाले आहे तशातच सोमवार दि १२ जूलै रात्रो ९ वाजता गाव झोपी गेला असता बिबट गावात शिरून मनोहर बुद्धाजी मडावी यांच्या घरातील कोंबड्या वर ताव मारण्याचा प्रयत्न केला मात्र झाप्यात बंदीस्त असलेल्या कोंबड्या चा जळफळाट चा आवाज एकून मनोहर काय झाले म्हणून पाहण्यासाठी कोंबड्या जवळ आला त्याचवेळी कोंबड्या वरची बिबट्याने घेतलेली झळप मनोहर च्या अंगावर आली त्यातच मनोहर जखमी झाले गावातील घटना असल्याने आरडाओरडा केल्याने गावकरी धावत आणी मोठा होणारा अनर्थ टळला यात मनोहर बुद्धाजी मडावी वय ५५ यांना दूखापत झाली असून घटणेची माहिती वनक्षेत्र अधीकारी संदीप लंगडे यांना देण्यात आली जखमीस तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले ..व वैद्यकीय अधिकारी च्या सुचणेनूसार पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले .. पुढील तपास क्षेत्रीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सचिन टेकाम ..अतीसीग्र दलाचे वनरक्षक सूनील नगारे ..व वनमजूर नामदेव काळे करीत आहे ..
या घटनेनंतर परीसरात दहशत पसरली असून परत घटना घडू नये यासाठी वनविभागाच्या वतीने गस्त वाढविली आहे