ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्षपदी समीर शिंदे*

*ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्षपदी समीर शिंदे*

ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्षपदी समीर शिंदे*
ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्षपदी समीर शिंदे*

*मिडिया वार्ता न्युज*
*पाचोरा तालुका प्रतिनिधी*
✍ *ईसा तडवी* ✍
*मो. 7666739067*

जळगाव – आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले समीर शिंदे यांची ट्रायबल फोरम जळगांव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष मुनीर तडवी कोल्हे सचीव पदी सक्रुद्दीन तडवी सावखेडा यांची निवड करण्यात आली आहे
४ जुलै रोजी ट्रायबल फोरमचे राज्यस्तरीय आँनलाँईन अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी ही निवड केली आहे.या प्रसंगी नाशिकचे सेवानिवृत्त केंद्रीय सनदी अधिकारी एकनाथ भोये,पुणेचे आदिवासी जमातींचे अभ्यासक मंजूर तडवी,आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या संचालिका मिनाक्षीताई वेट्टी, यवतमाळचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी
महेशकुमार सिडाम, मुंबईचे सदानंद गावित, रमेश परचाके,डॉ. दत्तात्रय दिघे,प्रा.चेतन गुराडा,पुणेचे डी.बी.घोडे, नाशिकचे हरीदास लोहकरे,नागपूरचे विवेक माळवी,पांढरकवडाचे रितेश परचाके आदि मान्यवर उपस्थित होते.
हे संघटन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी ट्रायबल फोरम या कँडरबेस शिस्तबध्द,वैचारिक असलेल्या फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर काम करीत आहे. वैचारिक व शिस्त असलेल्या संघटनमध्ये निवड झाल्यामुळे जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे.
ते आपल्या निवडीचे श्रेय दिलीप आंबवणे,अर्जून युवनाते, प्रफुल कोवे,कासम सुरत्ने,रोहित सुपे,मोगेश पावरा, डॉ.पंकज कुळसंगे,गुलाब भोईर,संपत रोंगटे,शालिक मरसकोल्हे, संपत रोंगटे, सिमाताई मंगाम यांना देतात.