जल पुनर्भरण उपाययोजनांच्या जनजागृती पोस्टर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन.

जल पुनर्भरण उपाययोजनांच्या जनजागृती पोस्टर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

जल पुनर्भरण उपाययोजनांच्या जनजागृती* *पोस्टर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन*
जल पुनर्भरण उपाययोजनांच्या जनजागृती पोस्टर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961

अकोला, दि.१३(जिमाका)- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेस पन्नास वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त प्रकाशित जल पुनर्भरण उपाययोजनांच्या जनजागृतीसाठी पोस्टर व माहिती पुस्तिकेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार या मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यामधील २० परिसंवाद जल साक्षरता अभियान अंतर्गत झाल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे, उप अभियंता यांत्रिकी मेंढे, कनिष्ठ भूवैज्ञानिक निलेश इंगळे, महेंद्र गवळी,राजीव गवई, विजय सोळंके, तांत्रिक अधिकारी भवाने, भावेश बनकर आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यालयाच्या परिसरात दर्शनी भागात पोस्टर्स लावण्यात आले.