*नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या “उर्दू घर” इमारतीचे 14 जुलै रोजी उद्घाटन*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961
नांदेड (जिमाका) दि. 13 :- नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या “उर्दू घर” इमारतीचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते बुधवार 14 जुलै 2021 रोजी होणार आहे. “उर्दू घर” मदिना तुल उलूम शाळेजवळ, देगलूर नाका नांदेड येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक हे असतील.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर श्रृंगारे यांची उपस्थिती राहील. याचबरोबर विधान परिषद सदस्य आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहनराव हंबर्डे, भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील-जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, महापौर सौ. मोहिनी येवनकर, अल्पसंख्यांक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह विविध मान्यवर, ऊर्दू साहित्यिक, ऊर्दू प्रेमी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता या उद्घाटन सोहळ्यास निमंत्रीतांनाच प्रवेश राहिल.