नागपुरात हाय प्रोफाइल कॉलोनीत ‘सेक्स रॅकेटच्या फर्दाफास, तीन महिला ताब्यात.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.14 जुलै:- नागपुर मध्ये पोलिसांनी एका सेक्स रॅकेटच्या पर्दाफास केला आहे. नागपुर मधील मनिष नगर परीसरात असणा-या दिलीप रेसिडेन्सी या बिल्डिंग मधील पॉश फ्लॅटमध्ये माघील अनेक दिवसा पासून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर नागपुर गुन्हे शाखेने छापा घातला. या छाप्यात देह व्यापार करणाऱ्या तीन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले तर महिला दलालाला अटक केली. प्रियंका शोएब अफजल सैय्यद वय 34 वर्ष असे महिला आरोपी दलालाचे नाव आहे.
राज्यात लागलेल्या लॉकडाउनमुळे सर्व व्यवसाय बंद करण्यात आले. त्यामुळे वेश्या व्यवसाय आता हाय प्रोफाइल झाला आहे. त्यामुळे वेश्या व्यवसायातील दलालानी आपला मोर्चा हा हाय प्रोफाइल असणा-या बिल्डिंग मध्ये सुरु करत आहे. त्यामुळे अशा लोकानवर कुणी संशय घेऊ शकत नाही.
प्राप्त माहितीनुसार, माघील काही दिवसा पासून नागपुरातील वेश्या व्यवसायातील कुख्यात महिला दलाल प्रियंका सैय्यद ही गेल्या अनेक दिवसांपासून देहव्यापारात सक्रीय आहे. ती तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून देहव्यापाराच्या दलदलीत ढकलते. आंबटशौकीन ग्राहकांना तरुणींचे फोटो पाठवून ती आकर्षित करते. तिने गेल्या काही दिवसांपासून मनिष नगरातील दिलीप रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील 401 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये देहव्यापार सुरू केला होता. फ्लॅटवर अनेक तरुणींची गर्दी होत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाचे पीआय ज्ञानेश्वुर भोसले यांना माहिती दिली.
शनिवारी पोलिसांनी सत्रा कडुन सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मंगला हरडे, संदीप चंगोले, राशिद खान, चेतन गेडाम, अजय पौनीकर, रिना जाऊरकर, प्रतिमा मेश्राम आणि सुजाता पाटील यांनी सापळा रचला. पोलिसांनी एक बनावटी ग्राहक पाठवून मुलींची मागणी केली. प्रियंकाने 5 हजार रुपयांत सौदा केला. काही वेळातच तरुणीला आणि पोलिसांनी पाठवलेल्या बनावटी ग्राहकाला रूममध्ये पाठविण्यात आले. पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा घातला. फ्लॅटमधील अन्य तीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तीनही तरुणी गरीब घरातील असून एक तरुणी ब्युटी पार्लरमध्ये कामाला होती. परंतु, लॉकडाउनमुळे हातचे काम गेल्याने तिच्यावर शरीर विकण्याची वेळ आली होती. या प्रकरणी पोलिसांनी प्रियंकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.