नागपुर पोलीस उपायुक्तांच्या खडा प्रहारा असलेल्या बंगल्यातून चक्क चंदनचोरी.

18

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.14 जुलै:- नागपुर येथील पोलीस उपायुक्त यांच्या घरातुन पोलिसाचा खडा प्रहारा असतांना चंदनाचे झाड चोरीला गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

नागपुर येथील पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांच्या सदरमध्ये असलेल्या सरकारी घराच्या परिसरातून चोरट्यांनी चंदनाचे झाड चोरून नेले. ही घटना दि. 12 जुलै रविवारला उघडकीस आली.

नागपुरच्या सिव्हील लाईन्स परीसरात सदर पोलीस स्टेशनच्या समोर उपायुक्त हसन यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या मागच्या भागाला लागुन एक नाला आहे. अनेक दिवसांपासून नाल्याच्या काठावर चंदनाचे झाड होते. शनिवारी रात्री संधी साधून चोरट्यांनी हे झाड कापून चोरून नेले. रविवारी सकाळी चंदन चोरीची घटना उघडकीस आल्याने बंगल्यावर तैनात पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. चोरीला गेलेल्या झाडाची किंमत साधारणता 8 ते 10 हजार रुपये असावी. 24 तास पोलिसांचा खडा पाहारा असूनही चोरट्यांनी चक्क झाड कापून चोरून नेल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.