गोळी चालल्याच्या अफवेने हिंगणघाट शहरात उडाली खळबळ.

गोळी चालल्याच्या अफवेने हिंगणघाट शहरात उडाली खळबळ.

गोळी चालल्याच्या अफवेने हिंगणघाट शहरात उडाली खळबळ.
गोळी चालल्याच्या अफवेने हिंगणघाट शहरात उडाली खळबळ.

मुकेश चौधरी✒
विदर्भ ब्युरो चीफ
7507130263
हिंगणघाट,दि.14 जुलै:- स्थानिक हिंगणघाट शहरातील संत चोखोबा वार्ड येथिल रहिवासी युवकास गोळी मारून जखमी केल्याची अफवा पसरली असून शहरात खळबळ निर्माण झाली आहे.

जखमी युवकाची मोहन उर्फ अज्जु प्रकाश भुसारी अशी ओळख असून जवळपास ७-८ गुंड प्रवृत्तीच्या युवकांसह भुषण देवतळे याने सदर युवकाच्या कानशीलात मारहाण करीत जखमी केले.

सदर घटना घडल्यानंतर जखमी युवकास आरोपींनी अपहृत केल्याची अफवा शहरात पसरली, याप्रकरणी जखमी युवकाचे वडील प्रकाश नारायण भुसारी यांनी आज दि.१४ रोजी पोलिसांत तक्रार केली.

सदर घटना आपसी वादातुन घडली असल्याची माहिती असून जखमी युवकाचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी सदर घटनेतील बंदूक ही टॉयगन असल्याचे सांगितले असून गोळी चालली असल्याची अफवा पसरली असल्याचे सांगण्यात आले. भांडणाचेवेळी टॉयगनने आरोपींनी सदर युवकावर हल्ला केल्याने त्याचे कानाला मार लागला आहे.

पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून फिर्यादिसुद्धा पोलिसांच्या संपर्कात आहे. दरम्यान पोलिस अधिक्षक काही कामाने शहरात आले असता सदर घटनेची त्यांनीसुद्धा माहिती जाणून घेतली.