हिंगणघाट आश्रय शहरी बेघर निवारा मध्ये मोठ्या प्रमाणात अफहार, सखोल चौकाशीची मागणी.

हिंगणघाट आश्रय शहरी बेघर निवारा मध्ये मोठ्या प्रमाणात अफहार, सखोल चौकाशीची मागणी.

हिंगणघाट आश्रय शहरी बेघर निवारा मध्ये मोठ्या प्रमाणात अफहार, सखोल चौकाशीची मागणी.
हिंगणघाट आश्रय शहरी बेघर निवारा मध्ये मोठ्या प्रमाणात अफहार, सखोल चौकाशीची मागणी.

✒️मुकेश चौधरी✒️
विदर्भ ब्यूरो चीफ
7507130263
हिंगणघाट दि.14 जुलै:- हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वार्ड परिसरातील नेहरू शाळा येथील आश्रय शहरी बेघर निवारा आहे. स्थानिक नगरपालिकेच्या वास्तुमधे असलेल्या बेघर निवाऱ्याचे व्यवस्थापण पालिकेने प्रेरणा वस्ती स्तर संघ संस्था यांना सोपविले असून या संस्थेला शासनाकडून उपलब्ध होत असलेल्या निधीचा गैरवापर होत असून याची चौकशी करण्याची मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ता दिनेश घनश्यामजी वर्मा यांनी पालिका मुख्याधिकारी जगताप यांचेकडे केली आहे.

दिसंबर २०२० च्या दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीवरुन शहरातील निराधार असणारे वृद्ध, मनोरुग्ण तसेच दिव्यांग नागरीकांकरीता तसेच नगराध्यक्ष बसंतानी यांच्या पुढाकाराने हा आश्रय शहरी बेघर निवारा शुरू करण्यात आला, या करीता पालिकेकडून इमारत उपलब्ध करण्यात आली तसेच येथील व्यवस्थापनाकरीता प्रेरणा वस्ती स्तर संघ संस्था यांची निवड करण्यात आली. सुरुवातीला शासनाकड़े निधि उपलब्ध नसल्याने या सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील देणगीदात्या नागरिकांकडून वस्तुरूपामध्ये मदत घेतली, वेळप्रसंगी या कार्यकर्त्यांनीसुद्धा आर्थिक मदत केली, येथे पलंग, टीवी, कूलर, पंखे, पेटी, कपडे, चादरी, ब्लॅंकेट, इत्यादि सुविधा देणगीरूपाने उपलब्ध करुन दिल्यात तसेच स्थानिक रोटरी क्लबच्यावतीने सर्व लाभार्थी निराधारांना महिन्यातून एकदा वैद्यकीय उपचार, तपासणी तसेच औषधीसुद्धा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली. सामाजिक संस्था तसेच रोटरी क्लब यांचे मदतीने आश्रय बेघर निवारागृह आकारास आले.

या बेघर निवारागृहाचे प्रत्येक अड़चणीचेवेळी सामाजिक कार्यकर्ता दिनेश वर्मा हे धावून जातात, संस्था तसेच दानदात्यांनी दिलेली मदत येथे पोचता करतात. परंतु येत्या काही दिवसात शासनाकडून या प्रेरणा संस्थेस निधी उपलब्ध झालेला आहे. या निधीमध्ये झालेले खर्च साफ खोटे असून गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.

माहे जून २०२१ मधे जाहिरात देऊन ३५ ते ४० लोकांचे साक्षात्कार घेण्यात आले ज्या मधे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या लोकांना कर्मचारी म्हणून नियुक्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु आक्षेप घेतल्याने नंतर साक्षात्कार रद्द करण्यात आले, प्रेरणा वस्ति स्तर संघ संस्था आश्रय शहरी बेघर निवारा मध्ये व्यवस्थापन करते आहे त्यांचे अध्यक्ष, सचिव तसेच उपाध्यक्ष यांनी दिसंबर २० ते आज पर्यन्त ५००० रु प्रति माह, प्रती व्यक्ति वेतनसुद्धा घेतले असल्याच्या गैरप्रकार केला आहे.

प्रेरणा वस्ती स्तर संस्था यांच्या कड़े कुठलेही रितसर कॅश बुक, व् खर्चाची हिशोबपत्रके तसेच घटना लिहिलेली नाही. अनेक खर्चाची बिलेदेखील उपलब्ध नाही. या आश्रय शहरी बेघर निवारा मध्ये या संस्थेचे १४ महिला बचत गट असून यामधील ६ गटांना येथे झालेले व्यव्हाराबद्दल कुठलीही माहिती देण्यात आली नाही,या संबंधीर नगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांकड़े तक्रार प्रलंबित आहे.

या शहरी बेघर निवाऱ्यामध्ये असलेल्या निराधार सदस्यांना देण्यात येत असलेले जेवण हे निष्कृष्ट दर्जाचे आहे अशीसुद्धा तक्रार आहे. प्रेरणा वस्ती स्तर संस्था यांच्या कड़े या आश्रय शहरी बेघर निवारा याचे हिशोब मागण्यात आले तेव्हा त्यानी दिलेल्या माहिती प्रमाणे डिसेंम्बर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यन्त यांना २,२३,६०३ रु शासननिधि मिळाला असून कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी ६२,२०० रु तसेच अन्य खर्च ९०४७० एकूण खर्च १,५२,६७० दाखविला असून यात मोठा घोळ झाल्याचा संशय आहे, याच्या चौकाशिचि मागणी करण्यात आली आहे.

सदर संस्थेस हिशोब मागितले असता त्यांनी मार्च २०२१ ते मई २०२१ पर्यन्त यांना २,५१,६७४ रु शासन कडून निधि भेटणार असून त्या अंतर्गत वेतनासाठी ६६,००० ,रु तसेच अन्य खर्च ३६,४१०, एकूण १,०२,४१०, दाखविला आहे,यातसुद्धा घोळ झाला आहे.

संस्थेत असलेले निराधार सदस्य यांच्या जेवन व अल्पोहार करीता भेटणारा अतिरिक्त निधि व झालेला खर्च यात मोठी तफावत दिसुन येत आहे. सदर प्रकरणी सखोल चौकाशीची मागणी सामाजिक कार्यकर्ता दिनेश वर्मा यांनी केली असून यातील गैरव्यवहार झालेली रक्कम वसूल करण्याचीसुद्धा मागणी तसेच याप्रकरणात जबाबदार असलेल्या पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.