अविनाश लेनगुळे ह्या 20 वर्षीय युवकास वाघाने हल्ला करून ठार केले…… अविनाश व त्याच्या परिवाराला न्याय देण्यासाठी लढा उभा करतोय आपण पण सोबत रहा…….*

*अविनाश लेनगुळे ह्या 20 वर्षीय युवकास वाघाने हल्ला करून ठार केले…… अविनाश व त्याच्या परिवाराला न्याय देण्यासाठी लढा उभा करतोय आपण पण सोबत रहा…….*

अविनाश लेनगुळे ह्या 20 वर्षीय युवकास वाघाने हल्ला करून ठार केले...... अविनाश व त्याच्या परिवाराला न्याय देण्यासाठी लढा उभा करतोय आपण पण सोबत रहा.......*
अविनाश लेनगुळे ह्या 20 वर्षीय युवकास वाघाने हल्ला करून ठार केले…… अविनाश व त्याच्या परिवाराला न्याय देण्यासाठी लढा उभा करतोय आपण पण सोबत रहा…….*

साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ : -यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील पीवरडोल गावात
दि. 9/7/21 रोजी अविनाश त्याच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर संध्या. 9.00 वा शौचास गेला असता अतिशय दर्दनाक पणे, वाघाने अविनाश वर झडप घेतली. अविनाश ला वाघाने बाजूच्या झुडपात ओढत नेले. गावातील लोकांना कळल्या बरोबर गावातील लोकांनी वनविभागाला माहिती दिली परंतु वनविभागाची अकार्यक्षम कर्मचारी सकाळी घटनास्थळी पोहचले, गावातील हजारो नागरिकांमध्ये असंतोष होता. तेव्हा वनविभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी पोलीस यंत्रणेला स्व : रक्षणा साठी त्या ठिकाणी बोलाविले वन विभागातील अधिकारी लोकांना खोटं सांगून समजाविण्याच्या प्रयन्त करीत होते. की रेस्क्यू टीम येत आहे. इकडे वाघ सकाळी 11. 00 वाजेपर्यंत अविनाश च्या शरीराचे लचके तोडत होता. आणि वनविभाग मात्र वाघाला वाचविणाचा प्रयन्त करीत होते. शेवटी वाघाला त्या दिवशी न पकडता हुसकावून लावण्यात आले.
अविनाश हा त्याच्या परिवाराची जबाबदारी पूर्ण सांभायात होता आज त्याच घर उघड्यावर पडलं आहे.
ह्याला वाघ जबाबदार आहे की वनविभाग ? वनविभागाने गावाला लागून असलेल्या अभयारण्याला कुंपण केले असते तर ही वेळ आली नसती, वनविभागाने वाघासाठी लागणारे खाद्य त्यांच्या झोन मध्ये निर्माण केले असते तर ही वेळ अविनाश वर ओढविली नसती, त्यामुळे वाघांचे व लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी वनविभाग ने निष्काळजी पणा, बेजाबदार पणा मुळे अनेक लोकांना वाघाचा आहार बनून आपला जीव गमवावा लागला.
(1 *) *तेव्हा बेजाबदार पानासाठी वनविभागातील विभागीय प्रधान मुख्य संरक्षक यांच्यावर अविनाश च्या हत्येचे जबाबदार म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावे.,
(2) अविनाश च्या परिवाराला 50 लाख रु. नुकसान भरपाई म्हणून द्यावी,
(3) अविनाशच्या परिवारातील शिक्षित सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे,
(4) टिपेश्वर अभयारण्याला कुंपण करण्यात यावे.**
या प्रमुख मागण्यांचे निवेदन ऍड राजेंद्रजी महाडोळे यांचे नेतृत्वात मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे याना देण्यात आले त्यांनी अविनाश न्याय देण्यासाठी सदर निवेदन त्वरित कारवाईसाठी अग्रेषित केले या वेळी. विविध सामाजिक संघटनांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.
रमेश गिरोळकर, अमोल गुरनुले, नंदू नेहारे, संजय पारधी, जितेंद्र हिंगासपुरे, विठ्लराव नागतोडे, रमेश वाढई, गणेश चहारे, राजेंद्र मांदाडे, राम भेंडारे
राष्ट्रीय ओबिसी क्रांती दल, अखिल भारतीय माळी महासंघ, आदिवासी गोवारी समाज संघटना, प्रांतिक तेली महासंघ, यांचा समावेश होता.