मुंबईत जोरदार पाऊस, पावसाचं पाणी आल रोड वर, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.

मुंबईत जोरदार पाऊस, पावसाचं पाणी आल रोड वर, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.

मुंबईत जोरदार पाऊस, पावसाचं पाणी आल रोड वर, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.
मुंबईत जोरदार पाऊस, पावसाचं पाणी आल रोड वर, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.

नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930

मुंबई,दि.16 जुलै:- मुंबईत काल पासून जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून पाऊस लगातार सुरु असल्याने मुंबईच्या अनेक भागात पाणी जमा झाल्याचे पहायला मिळतंय.

मुंबई महानगरासह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून पावसाने अक्षरश थैमान घातल्याचे पहायला मिळतंय. दादर, सायन, माटुंगा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. गेल्या अनेक तासांपासून हा पाऊस पडतोय. तर अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात देखील धुवाधार पाऊस बरसतोय. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दीड ते दोन फूटांपर्यंत अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं.

यामुळे दुचाकी आणि चार चाकींचे टायर देखील पाण्याखाली गेले होते तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची पावसाने मात्र चांगलीच तारांबळ उडवली आहे.

सकाळी 10 च्या सुमारास चेंबुर येथे अनेक लोकल थांबलेल्या होत्या. कुर्ला, सायन, चुनाभट्टी, विद्याविहार मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर पाणी विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान अनेक लोकल ट्रेन थांबल्या बघायला मिळाल्या प्रवासी ट्रॅक वर चालून स्टेशन गाठण्याचा प्रयत्न करत होते.

तर पावसामुळे लोकलची वाहतूक कोलमडली मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरु आहे. मध्य रेल्वेची वाहतूक स्लोवरून फास्टवर वळवण्यात आली.

मुंबईसह परिसरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र आहे. विक्रोळी ते घाटकोपरदरम्यान अनेक लोकल रखडल्या.

तर पावसाचं पाणी साचत असतानाच मुंबईतील अंधेरी सबवे परिसरात मॅनहोल ऑपन होतं. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दहिसर सबवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अनेक तासांपासून ही वाहतुक कोंडी आहे.