19 जुलै नंतर सांगली जिल्ह्यात कडक लॉकडाऊन निर्बंध लावल्यास तीव्र आंदोलन: वंचित बहुजन आघाडी आक्रमक

✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
9890093862
सांगली,दि.16 जुलै:- मागील वर्षा पासून कोरोना विषाणू मुळे संपुर्ण देशामध्ये वेळोवेळी लॉकडाउन झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. गेले दीड वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे आर्थिक तथा कामधंदा, सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू नाहीत अशातच पेट्रोल, डिझेल, डाळी, खाद्यतेल, गॅस, जीवनावश्यक वस्तू इत्यादी चे किमतीत भरमसाठ वाढ रोज होतच आहे यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडत आहे. लोकांचा उत्पन्नच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने खर्च हा मोठ्या प्रमाणावर होत आहे. हातावर पोट असणाऱ्याना लॉकडाउन मुळे सर्वच कामधंदा पूर्णता बंद असल्याने एक वेळचे अन्न पण लोकांना मिळत नाही यामुळे जीवन जगणे असहाय्य झाले आहे. लोक कोरोनामुळे नाही तर उपासमारीने अधिक मरत आहेत हाताला काम नसल्याने रोजगार नाही यामुळे घरखर्च चालवणे कठीण झाल्याने सर्व सामान्य माणूस व शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. आर्थिक कोंडी, उपासमार या सर्वांचे परिणाम म्हणून मानसिक ताण-तणाव वाढत चालले आहे. शेतकरी माल पिकवत आहे पण योग्य दर नसल्याने अनेकांनी आत्महत्येचे मार्ग स्वीकारत आहेत. छोटे-छोटे उद्योजक पुर्णपणे संपत चालले आहेत.
राज्य सरकार केंद्र सरकारवर टीका करत आहेत आणि केंद्र सरकारचे प्रियजन राज्य सरकारवर टीका करत आहेत परंतु ह्या दोघांच्यामध्ये देशाची व राज्याची सर्वसामान्य जनता मरत आहे. दोघांना जनतेचं भलं करायचं असेल तर दोघांच्या अधिकारातील जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे उदा. बँकेंचे कर्ज, कर्जावरील व्याज, पेट्रोल,डिझेल, गॅस, खाद्यतेल, वाढविलेल्या सर्व दर, शासकीय वसुली, विज दरवाढ, लॉक डाऊन काळातील वीजबिल माफ, दंडव्याज माफ, इत्यादी प्रकाचे निर्णय त्याच बरोबर चालू स्थितीत करण्यात येत असलेले निर्बंध हटवून सर्वसामान्य जनतेला जीवन जगणेस मदत करावी.
19 जुलै 2021 नंतर पुन्हा कडक निर्बंध लावून सर्वसामान्य जनतेला अडचण निर्माण करणारे निर्णय घेण्यात आले तर वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांना तीव्र विरोध करत सर्व छोटे मोठे व्यावसायिकांना सोबत घेऊन जन आंदोलन उभे करून रस्त्यावर उतरेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, महासचिव उमरफारूक ककमरी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय कांबळे, अशोक लोंढे, प्रशांत कदम, प्रशांत वाघमारे, वसंत भोसले, अनिल अंकल खोपे, कुमार कांबळे, अनिल मोरे, दीक्षांत सावंत, मिलिंद कांबळे, सागर आठवले, सिध्दार्थ लोंढे, शरद वाघमारे, ऋषिकेश माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.