नागपूर सेंट्रल जेल मध्ये गुन्हेगारांत मोठ्या प्रमाणात सुरु आहे ग्राँगवार.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.16 जुलै:- नागपुरात मोठ्या प्रमाणात क्राईम रेट वाढत असल्याची माघिल अनेक घटना वरुन समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची उपराजधानी क्राईमची राजधानी होते की काय असे प्रश्न सर्व समान्य नागकरी विचारत आहे.
नागपुर येथील सेंट्रल जेल मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपुर सेंट्रल जेलमध्ये मंगळवारी पुन्हा गुन्हेगारांच्या दोन गटांनी ऐकमेकांवर जीवघेना हल्ला केल्याने नागपुर सेंट्रल जेलमधिल सुरक्षा बदल प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. या घटनेत तीन आरोपी जखमी झाले आहेत. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी एका गटावर अदखलपात्र, तर दुसऱ्या गटाविरुद्ध हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
माघील काही दिवसा पासून नागपुर सेंट्रल जेल मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रँगवार वाढले आहे. तीन आठवड्यांमध्ये कैद्यांमध्ये मारहाण होण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे सेंट्रल जेल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
पाचपावलीतील गुन्हेगार मो. अमीर पटेल खुनाच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. मंगळवारी दुपारी अमीरवर प्रतिस्पर्धी गुन्हेगार शेख रिजवान शेख मुजीब, प्रज्वल विशाल शेंडे, संतोष अच्छेलाल गोंड यांनी हल्ला केला. त्यांनी लाथा-बुक्क्यांनी अमीरला मारहाण केली. या घटनेमुळे अमीर संतापला. अमीरचे साथीदार सौरभ तायवाडे आणि मोनू समुंद्रे यांनी लोखंडाच्या पट्टीने शेख रिजवानवर हल्ला केला. गालावर वार करून रिजवानला जखमी केले. या हल्ल्यादरम्यान लोखंडाच्या पट्टीमुळे मोनू समुंद्रे स्वत:ही जखमी झाला. बरॅक क्रमांक पाचमध्ये घडलेल्या या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली.