मुंबईत कोरोनाचे सर्व नियम पायदळी, मुंबई परत बनेल काय कोरोनाची राजधानी?

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930
मुंबई,दि.17 जुलै:- राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी मोठ्या प्रमाणात लोक कोरोना वायरस संबंधित नीयम सर्रासपणे पायाखाली तुडवत असल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे. कोरोना वायरसची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसरी लाट येणाची शक्यता शास्त्रज्ञ बोलात आहे.
मुंबई कोरोना वायरसच्या प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. तरी माघिल 24 तासात 5 हजाराहून अधिक लोकं कोरोना वायरस बाधिताच्या संपर्कात आले असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यातील साधारणता 75% लोकं हाय रिस्क मध्ये असल्याने ही संख्या कमी करणे मोठे आव्हानात्मक बनले आहे. मुंबईत माघील 24 तासात 446 नवे रुग्ण सापडले. रुग्णासंख्या 500 च्या आत आल्याने कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे दिसते. असे असले तरी शुक्रवारी बधितांच्या संपर्कात आलेल्या 5,627 लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यात आले. त्यातील 4,113 73 % लोकं ‘हाय रिस्क’ होते तर 1,514 (27%) लोकं ‘लो रिस्क’ मध्ये होते.
मुंबईत आतापर्यंत बधितांच्या संपर्कात आलेल्या 79,09,928 कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यात आले. त्यातील 44,02,839 (56%) ‘हाय रिस्क’ मध्ये तर 35,07,089(44%) ‘लो रिस्क’ मध्ये होते. 7,29,795 लोकं पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत सध्या फक्त 829 लोकं संस्थात्मक विलगिकरणात आहेत. तर आतापर्यंत 1,55,582 लोकांनी संस्थात्मक विलगिकरण झाले आहे. 86,968 लोक गृह विलगिकरणात असून आतापर्यंत 78,22,131 लोकांनी गृह विलगिकरण पूर्ण केले आहे.