सर्व मंदीर उघडा, पंढरीचा वारीला परवानगी द्या; नागपुर मध्ये विहिंपचे आंदोलन.

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.17 जुलै:- कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण राज्यात संचारबंदी आणि लॉकडाउन लावण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंदीरे बंद आहे. माघील वारीला पण परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे नागपुर विहिंप तर्फे हे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रात साडेसातशे वर्षांची पायीवारीची परंपरा असलेल्या वारीला परवानगी द्या आणि राज्यातील सर्व मंदिर उघडा अशी मागणी करत शनिवारी विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने नागपुरात प्रतीकात्मक दिंडी आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात सुमारे अडीच तास विठ्ठलाची भजने गात वारकऱ्यांनी सरकारकडे आपली मागणी नोंदविली.

या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषदेसह विश्व वारकरी सेवा संस्था, ज्ञानदेव-तुकाराम प्रतिष्ठान, संत गजानन महाराज समिती, जलाराम सत्संग मंडळ, वैदर्भीय हरिकीर्तन संस्था, अखिल ब्रह्मवृंद संस्था आणि लोकजागृती मोर्चा आदी संस्थांनी आणि संघटनांनी सहभाग घेतला होता.